- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, देश एका भयावह वळणावर – भाग क्र.-१ देशाची वाटचाल आर्थिक खाईच्या दिशेने सुरू…. देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण होत आली आहेत.या प्रदीर्घ वाटचाली नंतर तो आता एका भयावह वळणावर येऊन पोहोचला आहे.कोणी कितीही दावे करोत,पण देशाचा चेहरा पार काळवंडला गेला आहे.आपले नराधम राजकारणी देशाच्या पुरोगामी चेहऱ्यावर धर्मांधतेचे काळे फासण्यात यशस्वी झाले आहेत.त्यामुळे देशाची आर्थिक,सामाजिक व सांस्कृतिक,घडी पार विस्कळीत झाली आहे.सत्ता ही गोरगरिबांच्या उत्थानासाठी नाहीतर ओरबडण्यासाठी असते,असा गैरसमज करून घेऊन गेल्या आठ दशकात राजकारण्यांनी आपला देश लुटला.अक्षरशः देशाचे लचके तोडले.धर्मवादाने समाजवादाचा फडशा पाडला.अशी परिस्थिती असताना देखील आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला देश पाच ट्रीलियन डॉलर्सची अर्थव्यवस्थेच्या दिशेने…
सुरेश काटे,तलासरी ‘राणी दुर्गावती नर्सरी’ ठरतेय पर्यावरणाचे प्रतीक, तलासरी तालुक्यातील पीएम श्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा,वरवाडा येथे नुकताच एक आगळावेगळा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला.शाळेतील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ‘राणी दुर्गावती नर्सरी,’मध्ये तब्बल पंधराशे झाडांची रोपे तयार करण्यात आली. या नर्सरीतून फुलझाडे, शोभेची झाडे,तसेच विविध उपयोगी वनस्पतींची रोपे तयार करण्यात आली.आणि ती शाळेच्या आवारात तसेच शेजारी असलेल्या गोलेरी डोंगरीवर लावण्यात आली. डोंगरी भागात जेथे पूर्वी मोकळं आणि रखरखीत वातावरण होतं,तेथे आता हिरवळ पसरू लागली आहे. हा उपक्रम केवळ वृक्षारोपणाचा नव्हे,तर विद्यार्थिनींच्या पर्यावरणविषयक जाणीव, समर्पण आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनाचा ठोस पुरावा आहे. यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन…
दिपक मोहिते, ” रणसंग्राम,” तरच बहुजन विकास आघाडी,भाजपचा अश्वमेघ घोडा रोखू शकेल…. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून प्रभाग रचना व मतदारांच्या यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.दिवाळीनंतर या निवडणुका होण्याची शक्यता आहे.प्रभाग रचना करताना सर्वच राजकीय पक्षानी दक्ष राहण्याची गरज आहे.सत्तेत असलेला पक्ष,आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला पाडण्यासाठी आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना करण्याची कट कारस्थाने करत असतो.यापूर्वी अनेक महानगरपालिका निवडणुकीत अशाप्रकारची कटकारस्थाने अनुभवायला मिळाली आहेत.अशा गैरकृत्यामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी व निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील सामील असतात.यामध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक देवाण घेवाण होत असते.त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला या प्रक्रियेवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे. एकीकडे निवडणूक…
वसंत भोईर,वाडा श्रमजीवी संघटनेचे आंदोलन स्थगित, भिवंडी- वाडा- मनोर या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात श्रमजीवी संघटनेने नुकतेच रास्ता रोको आंदोलन केले. डाकिवली फाटा,कुडूस,शिरीष पाडा,खंडेश्वरी नाका या चार ठिकाणी एकाच वेळी रस्ता कार्यकर्त्यांनी रोको आंदोलन केले. तब्बल बारा तास चाललेले हे आंदोलन रात्री ११.३० वाजता लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.संघटनेचे शिष्टमंडळ आणि ठाणे व पालघर जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे,कार्यकारी अभियंता सचिन पाटील,वाडा उपविभागीय अधिकारी संदीप चव्हाण,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झाल्टे पाटील,जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे भिवंडी तहसीलदार अभिजीत खोले,वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे,ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे,यांच्यासह महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चेनंतर मार्ग निघाला. या…
दीपक मोहिते, ” रणसंग्राम,” शिवसेना ( उबाठा ) / मनसे युती ; अखेर घोडं गंगेत न्हालं, भाजपच्या गोटात अस्वस्थता… गेल्या तीन महिन्यापासून उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांच्या एकत्र येण्यावरून जोरदार चर्चा सुरू होती.अखेर काल या दोघांनी एकमेकांना टाळी दिली.हे दोघे भाऊ एकत्र येऊ नयेत,यासाठी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे हे दोघे पाण्यात देव टाकून बसले होते.पण या दोघांना पाण्यातील देव काही बाहेर काढता आले नाहीत.या दोघांच्या एकत्र येण्याच्या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला धोका निर्माण होऊ शकतो.या दोघांच्या पक्षाचा हिंदी सक्तीच्या विरोधात आता संयुक्त मोर्चा निघणार आहे.त्यामुळे भाजपच्या गोटात सध्या अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. राज्यातील प्रत्येक…
दीपक मोहिते, ” महानगरपालिका रणसंग्राम,” ” हिंदीची सक्ती,” महायुतीसाठी आत्महत्या ठरू शकते, केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर केला नसला तरी राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे.” हिंदीची सक्ती,” हा एकमेव अजेंडा घेऊन उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघा ठाकरे बंधूनी महायुतीला चांगलेच खिंडीत पकडले आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने लादलेली ” हिंदीची सक्ती,” महायुती सरकारच्या चांगलीच अंगलट आली आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारचा आत्मघाती निर्णय घेऊन भाजपने ” हात दाखवून अवलक्षण,” अशी स्वतःची अवस्था करून घेतली आहे.सरकारला सुचलेली ही अवदसा,आम्हा इच्छुक उमेदवारांना या निवडणुकीत त्रासदायक ठरू शकते,अशा प्रतिक्रिया महायुतीमधून व्यक्त होत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती…
सुरेश वैद्य,पालघर, जव्हार आणि मोखाडा अंगणवाडी सेविका बनल्या प्रशिक्षक, जव्हार आणि मोखाडा तालुक्यांतील मॉडेल अंगणवाडी सेविकांनी ” पालवी,” प्रकल्पाच्या सहाव्या स्तराचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षक म्हणून आपली जबाबदारी स्विकारली आहे. ” पालवी,” हा उपक्रम क्वेस्ट संस्थेने रोटरी क्लबच्या आर्थिक साहाय्याने,महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद पालघर यांच्या सहकार्याने २०२४ मध्ये सुरू झाला. २५ व २६ जून २०२५ रोजी मोखाडा येथील हिल व्ह्यू रिसॉर्ट येथे हे निवासी प्रशिक्षण संपन्न झाले.या प्रशिक्षणात क्वेस्ट संस्थेचे कल्पेश पाटील आणि पालिका मोरे यांनी सेविकांना प्रत्यक्ष शैक्षणिक कृतींच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.अक्षर ओळख, लेखनवाचन,गणिती संकल्पना,गट खेळ, अभिनयगीत यांसारख्या कृतींमधून बालकांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, यावर…
वसंत भोईर,वाडा जिल्हा परिषदेच्या नववी व दहावीच्या वर्गांना शिक्षकच नाही, वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या डाहे व वरसाळे या दोन शाळांमध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.मात्र या दोन्ही शाळांमध्ये अद्याप शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतबला केवळ बसून राहाण्याची पाळी आली आहे. पालघर जिल्हा परिषदेकडून २०१७ पासून इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत,या दोन वर्गांसाठी मानधन तत्वावर खाजगी शिक्षणाची नेमणूक करण्यात आली असून त्यांचे मानधन जिल्हा परिषद सेस फंडातून दिले जाते.मात्र यंदा शाळा सुरू होऊन १५ दिवस होत आले,तरीही सदर शिक्षकांची नेमणूक केली नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या…
वसंत भोईर,वाडा उचाट शिक्षण संस्थेचे शिक्षक कैलास पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा, तालुक्यातील उचाट शिक्षण संस्थेच्या अस्पी विद्यालय व ना.आ.शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक कैलास जगन्नाथ पाटील ( उच्च माध्यमिक ) यांचा सेवापूर्तीचा भावपूर्ण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. कैलास पाटील यांनी २६ वर्षे समर्पित भावनेने सेवा बजावली.मराठी भाषेवर विशेष प्रभुत्व असल्याने त्यांचे शिकवणे प्रभावी कसे होते,हे एका माजी विद्यार्थिनीने आपल्या ओघवत्या शैलीत सांगितले.विशेष म्हणजे पाटील हे अनेक वर्षांपासून रोज न चुकता एका टेकडीवर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात योगासने करीत असतात. म्हणून त्यांचा सेवापुर्ती कार्यक्रम योग दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थी व उपस्थितांसोबत विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून योगधारने संबंधी उद्बोधक…
दीपक मोहिते, काय बोलावे ? 🤦♂️ ” पर्यावरण रुसले व पर्यावरणवादी चिखलात रुतला,” दोन दिवसांपूर्वी बोरिवली येथे एका विकासकांच्या घरी जाऊन वसुलीचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एका तथाकथित पर्यावरणवादी पदाधिकाऱ्यावर बोरिवली येथील कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या घटनेनंतर काँग्रेसच्या प्रदेक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पर्यावरण प्रेमीला तडकाफडकी पर्यावरण विभागाच्या अध्यक्षपदावरून निलंबित केले.दुसरीकडे याच पक्षाचे एक पदाधिकारी जिल्हाध्यक्ष अरनॉल्ड जिगुल व तिघांवर एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात पक्षाच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक व त्यांच्या सहकाऱ्यांनी पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली जिल्हाभरात अक्षरशः धुडगूस घातला होता.मध्यंतरीच्या काळात हा पर्यावरणवादी समुद्रकिनारी सुरू असलेल्या…
