वसंत भोईर,वाडा
जिल्हा परिषदेच्या नववी व दहावीच्या वर्गांना शिक्षकच नाही,
वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या डाहे व वरसाळे या दोन शाळांमध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.मात्र या दोन्ही शाळांमध्ये अद्याप शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतबला केवळ बसून राहाण्याची पाळी आली आहे.
पालघर जिल्हा परिषदेकडून २०१७ पासून इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत,या दोन वर्गांसाठी मानधन तत्वावर खाजगी शिक्षणाची नेमणूक करण्यात आली असून त्यांचे मानधन जिल्हा परिषद सेस फंडातून दिले जाते.मात्र यंदा शाळा सुरू होऊन १५ दिवस होत आले,तरीही सदर शिक्षकांची नेमणूक केली नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या डाहे व वरसाळे या दोन शाळांमध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.या दोन्ही शाळा अतिदुर्गम भागात आहेत.मात्र या दोन्ही शाळांमध्ये यावर्षी अजूनही शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आले नसल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

