वसंत भोईर,वाडा
उचाट शिक्षण संस्थेचे शिक्षक कैलास पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा,
तालुक्यातील उचाट शिक्षण संस्थेच्या अस्पी विद्यालय व ना.आ.शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक कैलास जगन्नाथ पाटील ( उच्च माध्यमिक ) यांचा सेवापूर्तीचा भावपूर्ण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
कैलास पाटील यांनी २६ वर्षे समर्पित भावनेने सेवा बजावली.मराठी भाषेवर विशेष प्रभुत्व असल्याने त्यांचे शिकवणे प्रभावी कसे होते,हे एका माजी विद्यार्थिनीने आपल्या ओघवत्या शैलीत सांगितले.विशेष म्हणजे पाटील हे अनेक वर्षांपासून रोज न चुकता एका टेकडीवर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात योगासने करीत असतात. म्हणून त्यांचा सेवापुर्ती कार्यक्रम योग दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थी व उपस्थितांसोबत विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून योगधारने संबंधी उद्बोधक मार्गदर्शन केले.
या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनी पाटील यांच्या दैनंदिन योगसाधनेमुळे निवृत्त होताना देखील त्यांच्यामध्ये प्रचंड शारीरिक ऊर्जा असल्याचे आणि स्वभाव शांत व संयमी असल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण घालवण्यासाठी व अभ्यास करताना एकाग्र होण्यासाठी सरांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.यावेळी पाटील यांनी आपल्या मनोगतात सेवेत रुजू झाल्यानंतर केलेल्या संघर्षाचा तसेच सेवेतील अनेक आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ए.एम.भोईर यांनी केले तर निवेदन एन.जे. पाटील यांनी केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर मोरे, रवींद्र मोरे,प्रभाकर भाई मोरे, दीपक मोरे,संस्थेचे काही निवृत्त सहकारी शिक्षक, ग्रामस्थ,शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी,नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित ह

