दीपक मोहिते,
काय बोलावे ? 🤦♂️
” पर्यावरण रुसले व पर्यावरणवादी चिखलात रुतला,”
दोन दिवसांपूर्वी बोरिवली येथे एका विकासकांच्या घरी जाऊन वसुलीचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एका तथाकथित पर्यावरणवादी पदाधिकाऱ्यावर बोरिवली येथील कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या घटनेनंतर काँग्रेसच्या प्रदेक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पर्यावरण प्रेमीला तडकाफडकी पर्यावरण विभागाच्या अध्यक्षपदावरून
निलंबित केले.दुसरीकडे याच पक्षाचे एक पदाधिकारी जिल्हाध्यक्ष अरनॉल्ड जिगुल व तिघांवर
एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षात पक्षाच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक व त्यांच्या सहकाऱ्यांनी पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली जिल्हाभरात अक्षरशः धुडगूस घातला होता.मध्यंतरीच्या काळात हा पर्यावरणवादी समुद्रकिनारी सुरू असलेल्या रिसॉर्टसच्या मागे हात धुवून लागला होता.भयभीत झालेल्या रिसॉर्टस मालकांनी त्यावेळी काँग्रेसच्या एका नेत्याला मध्यस्थी करायला लावून तडजोड केली होती.आता या घटनेनंतर हे रिसॉर्टस मालक त्याकाळात आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत.
दुसरीकडे उपजिल्हाध्यक्ष अरनॉल्ड जिगुल हा वसईच्या पूर्व भागात अनधिकृत बांधकामे करत असतो.तो पक्षाचे जिल्हाध्यक्ष ओनील अल्मेडा यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो.या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाध्यक्ष ओनील अल्मेडा यांच्याकडून अहवाल मागवला आहे.त्यामुळे तालुक्यात सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.वसई तालुक्यात काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे सध्या माहिती अधिकाराच्या माध्यमातून महानगरपालिकेत जोरदार वसुली करत असतात.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एका पदाधिकाऱ्याने ” मी,निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे रिंगणात आहे,असे सांगत नायगाव पूर्व भागातील बांधकाम व्यवसायिकांकडे वसुलीचा प्रयत्न केला होता.पण तेथे सक्रिय असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने त्याची डाळ शिजू दिली नव्हती.जिल्ह्यात पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय असताना पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र दिवसेंदिवस मस्तवाल होत चालले आहेत.पक्षाचे नेते राहूल गांधी यांच्या ” भारत जोडो,” यात्रेत राहुल यांचा हात हातात घेऊन सेल्फी काढणाऱ्या समीर वर्तक यांचे ते सेल्फी आता विरोधी पक्ष,सर्वत्र व्हायरल करत आहेत.

