Author: दीपक मोहिते

संजय लांडगे,वाडा आबिटघर परिसर पांघरणार हिरवाईचा शालू, ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी संतोष साठे यांच्या नेतृत्वाखाली अबिटघर ग्रामपंचायत नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विविध समाजोपयोगी संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करत असते.याचाच एक भाग म्हणून मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या मासिक सभेत आबिटघर गावाचा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव यांनी गाव आणि परिसरात ढासळणाऱ्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी परिसरातील शेकडो एकर जंगलात झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करावे.तसेच हा प्रकल्प राबवताना ग्रामपंचायत हद्दीतील उद्योजकांचे सहकार्य घेऊन त्यांचा सीएसआर फंड व गरजेनुसार ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीचा उपयोग करावा असा ठराव मांडला.त्यास सदस्य कुलदीप पाटील यांनी अनुमोदन दिले तर सरपंच साक्षी संतोष साठे, उपसरपंच सुप्रिया…

Read More

संजय नेवे,विक्रमगड खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडीचा पाडा येथे पाणीटंचाईला सुरुवात, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असुन ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यावरील विहिरीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.अशा परिस्थितीमध्ये सर्वत्र पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडीचापाडा येथील अनेक विहिरींनी तळ गाठले असून या भागातील लोकांची पाण्यासाठी पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. ग्रामपंचायतीने पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तापमान वाढल्यामुळे पाण्याची पातळी सतत कमी होत चालली आहे. तालुक्यातील काही गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.त्यासाठी तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तयार करणे, आवश्यक असून पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी लोकप्रतिनिधी केली आहे.

Read More

संजय नेवे,विक्रमगड सन २०२५ – ३० या कालावधीसाठी आज तहसील कार्यालयात सरपंचपदाची सोडत संपन्न, वअनुसूचित क्षेत्रातील येणाऱ्या ग्रामपंचायतीचे ५० % आरक्षण निश्चित केल्यानुसार अनुसूचित जमाती सरपंचपदाचे आरक्षण सोडत आज तहसील कार्यालयात पार पाडण्यात आली. या सोडतीमध्ये महिलांसाठी राखीव ग्रामपंचायती खालील प्रमाणे- तलवाडा,वेहेलपाडा,कऱ्हे तलावली,खडकी,डोल्हारी बु. जांभे,डोल्हारी खुर्द,करसोड, मोह बुद्रुक,ओंदे,केव,सारशी, देहर्जे,सवादे भोपोली घाणेकर,आंबेकर तर्फ धरमपूर,खुडेद, म्हसरोली,इंदगाव या ग्रामपंचायतीमध्ये महिला आरक्षण असून उर्वरित १९ ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमातीसाठी पुरुष राखीव ग्रामपंचायत,दादडे,उटावली, कुंझे,केगवाआलोंडा, सुकसाळे,वसुरी,साखरे, बोरांडा,कोंडगाव, चिंचघर,मलवाडा,चापके तलावली,बांधन,कासा बुद्रुक खोस्ते,उपराळे ,वेढेचरी ,टेटवाळी,या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या सोडतीचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमास विद्यमान सरपंच, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तहसीलदार चारुशीला पवार यांच्या देखरेखीखाली आरक्षण सोडत काढण्यात आली.

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर,४२ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव, वाडा तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण आज तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी पंचायत समिती प्रशिक्षण सभागृहात जाहीर केले. यावेळी ४२ ग्रामपंचायती या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.सन २०२५ ते २०३० या काळावधीसाठी हे आरक्षण असणार आहे.वाडा तालुका हा पेसा क्षेत्रात येत असल्याने ८४ ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. तालुक्यातील सांगे नाणे,गालतरे,सुपोंडे,आंबिस्ते बुद्रूक.खानिवली, पिंपळास, आखाडा,कासघर, कळंभे,पीक,कोने,कोनसई, बालिवली, बिलघरऐनशेत, शेले,चिखले,कुयलू,मांगरूळ, बिलावली,मांडवा,उज्जैनी, डोंगस्ते,कुडूस,कोंढले, नारे,खुपरी,उसर,वसूरी बु.देवघर,केळठण,देवळी, हारोसाळे,जामघर,मानिवली, बुधावली,पोशेरी,तुसे,गांधरे, सोनशिव,सारसी व ब्राम्हणगाव या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. आरक्षण सोडतीस वाडा उपविभागीय कार्यालयाचे शिरस्तेदार सुनील लहांगे,नायब तहसीलदार रनजीत शिराळकर यांच्यासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच,…

Read More

दीपक मोहिते, ” सरकारसाठी लाजिरवाणी बाब, ” अक्षय शिंदे एनकाउंटर, सरकार तोंडावर आपटले, पोलिसांवर गुन्हे दाखल होणार, बदलापूर बलात्कार कथित प्रकरणी एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकार चांगलेच तोंडावर आपटले आहे.” करून दाखवले,” असे होर्डिंग लावणारे तसेच रुग्णालयात जाऊन पोलिसांना बुके देणाऱ्या महाभागावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण गुन्हेगारांना साथ देणारेही गुन्हेगार असतात. उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी आरोप करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे.अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाल्यानंतर त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी पोलिसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – वनमंत्री गणेश नाईक यांच्यात शीतयुद्ध सुरू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खिंडित पकडण्याची एकही संधी भाजप सोडत नाही,असे स्पष्ट होत आहे.मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अनेक निर्णयाना फडणवीस सरकारने यापूर्वीच स्थगिती दिली आहे.तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक,या दोघांनी ठाणे व पालघर जिल्ह्यावरील शिंदे गटाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी कंबर कसली आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काही दिवसांपूर्वी गणेश नाईक यांनी पालघर येथे जनता दरबार आयोजित केला होता.या जनता दरबारात ” सबकुछ भाजप,” असे चित्र पाहायला मिळाले.शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी या दरबाराकडे फिरकलेच नाही.या दरबारानंतर गणेश…

Read More

दीपक मोहिते, भाग क्र. २, ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे शेअर बाजार कोसळला,एका दिवसात १७ लाख कोटी डॉलर्सचे नुकसान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व अॅलन मस्क या दोघांनी घेतलेल्या विविध निर्णयाविरोधात त्यांच्या देशातील छोटे व्यापारी व जनता आता रस्त्यावर उतरून आंदोलने करू लागली आहे.पण हट्टी स्वभाव असलेले ट्रम्प आपल्या निर्णयात बदल करतील,असे वाटत नाही.दरम्यान ट्रम्प यांना रोखण्यासाठी चिनी ड्रॅगन पुढे सरसावला आहे.चीनच्या सरकारनेही ट्रम्प या निर्णयाला सडेतोड उत्तर दिले आहे.त्यांनीही अमेरिकेच्या उत्पादनावर लावण्यात येणारे शुल्क वाढवले आहे. दरम्यान ट्रम्प यांना अमेरिकन व्यापारी व लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.ट्रम्प यांच्या निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.काल जगभरातील शेअर बाजार जबरदस्त कोसळला.एका दिवसात सुमारे…

Read More

सुरेश वैद्य,सफाळे, ९ एप्रिल रोजी पालघर येथे लोकदरबाराचे आयोजन, पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुध.९ एप्रिल,२०२५ रोजी दु.३.०० वा.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील,नियोजन समिती सभागृह,पालघर येथे लोक दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकदरबारात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पालघर जिल्ह्यातील जनतेशी थेट संवाद साधणार असून पालघर जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुख या लोकदरबारास उपस्थित राहणार आहेत.पालघर जिल्ह्यातील लोकदरबार कार्यक्रमामध्ये दु.१.०० वाजल्यापासून नागरिकांना टोकन क्रमांक देण्यात येणार आहेत.तरी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या लोकदरबारास उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी केले आहे.

Read More

जव्हार प्रतिनिधी, देहरे आश्रमशाळा येथे करियर मार्गदर्शन शिबीर संपन्न, विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी नंतर कोणत्या दिशेने वाटचाल करावी,कोणते करिअर निवडावे,स्पर्धा परीक्षा,कौशल्याधारित शिक्षण,तांत्रिक अभ्यासक्रम, वैद्यकीय क्षेत्र,परदेशी शिक्षण अशा विविध संधींबाबत योग्य माहिती मिळावी,या उद्देशाने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा,देहरे ( जव्हार ) येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत “ दहावी व बारावीनंतर काय?” या विषयावर करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना समोरासमोर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किशोर मानभाव ( पोलीस निरीक्षक, जव्हार ) यांनी पोलीस भरती,विविध स्पर्धा परीक्षांबाबत सविस्तर माहिती दिली.त्यांनी सायबर गुन्हेगारी व ‘अपघातमुक्त गाव’ या संकल्पनांचे प्रबोधन करत सामाजिक सजगतेचा…

Read More

रविंद्र राऊळ,मुंबई उत्तर मुंबईत साजरा झाला रामनवमी सोहळा, उत्सव रॅली,शोभा यात्रा,भव्य पालखी सोहळा आणि गरबा रजनी अशा अनेकविध धार्मिक कार्यक्रमांनी काल उत्तर मुंबई दुमदूमली होती. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीने जल्लोषात अधिकच भर पडली. मालाड ( पूर्व ) येथील कुरार गावातील जमरुषी नगरात भव्य रामनवमी उत्सव रॅली काढण्यात आली. मालाडच्या गोरसवाडी येथील भद्रनगर राम मंदिरात श्री राम जन्मोत्सव आयोजित करण्यात आला होता. मालवणी येथील सकल हिंदू समाजातर्फे शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेमध्ये विश्व हिंदू परिषद, दिंडोशी येथील बजरंग दलाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. मालाड ( पश्चिम ) येथील शैलेश नगरात भव्य रामनवमी जन्म उत्सव…

Read More