संजय नेवे,विक्रमगड
सन २०२५ – ३० या कालावधीसाठी आज तहसील कार्यालयात सरपंचपदाची सोडत संपन्न,
वअनुसूचित क्षेत्रातील येणाऱ्या ग्रामपंचायतीचे ५० % आरक्षण निश्चित केल्यानुसार अनुसूचित जमाती सरपंचपदाचे आरक्षण सोडत आज तहसील कार्यालयात पार पाडण्यात आली.
या सोडतीमध्ये महिलांसाठी राखीव ग्रामपंचायती खालील प्रमाणे-
तलवाडा,वेहेलपाडा,कऱ्हे तलावली,खडकी,डोल्हारी बु. जांभे,डोल्हारी खुर्द,करसोड, मोह बुद्रुक,ओंदे,केव,सारशी, देहर्जे,सवादे भोपोली घाणेकर,आंबेकर तर्फ धरमपूर,खुडेद, म्हसरोली,इंदगाव या ग्रामपंचायतीमध्ये महिला आरक्षण असून उर्वरित १९ ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमातीसाठी पुरुष राखीव ग्रामपंचायत,दादडे,उटावली, कुंझे,केगवाआलोंडा, सुकसाळे,वसुरी,साखरे, बोरांडा,कोंडगाव, चिंचघर,मलवाडा,चापके तलावली,बांधन,कासा बुद्रुक खोस्ते,उपराळे ,वेढेचरी ,टेटवाळी,या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या सोडतीचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमास विद्यमान सरपंच, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तहसीलदार चारुशीला पवार यांच्या देखरेखीखाली आरक्षण सोडत काढण्यात आली.

