वसंत भोईर,वाडा
अबिटघर ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन,
सातत्यपूर्ण सामाजिक कार्य आणि नवनवीन लोकोपयोगी व समाजोपयोगी उपक्रमांची आखणी तसेच विविध धोरणात्मक निर्णयाच्या माध्यमातून ग्रामपंचायत अबिटघरच्या सरपंच साक्षी संतोष साठे,उपसरपंच सुप्रिया पाटील व ग्रामपंचायत कार्यकारिणी सोबतच ग्रामपंचायत अधिकारी संजय पाटील यांच्या प्रयत्नाना यश येऊन अखेर अबिटघर ग्रामपंचायतीला आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटन,) दर्जा प्राप्त झाला.
विद्यमान सरपंच साक्षी संतोष साठे,उपसरपंच सुप्रिया पाटील,सदस्य भरत जाधव,कुलदीप पाटील, धनश्री पाटील,भावना रायात, कल्याणी साठे,मनिषा मुकणे,निखिल पाटील,स्मिता चिमडा,कल्पेश आमले यांच्या सोबतच ग्रामपंचायत अधिकारी संजय पाटील आणि त्यांच्या समवेत काम करणारे कर्मचारी यांच्या अथक आणि सातत्यपूर्ण कामासोबतच संपूर्ण गावकऱ्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे आमची ग्रामपंचायत प्रगतीचे एक एक टप्पे पार करत असल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली.तसेच सदर कार्यकारिणीच्या माध्यमातून उर्वरित काळात अजूनही चांगले कार्य होईल व गावाचा लौकिक वाढेल,असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

