वसंत भोईर,वाडा
वाडा तालुका देखरेख संघाची निवडणूक बिनविरोध,
वाडा तालुका देखरेख संघ ही वाडा तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांची शिखर संस्था असून या संस्थेच्या पाच संचालक पदाच्या जागासाठी निवडणूक अलिकडेच जाहीर झाली होती.मात्र काल अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाचच अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.
सुनील मोकाशी ( कोनसई सेवा सहकारी सोसायटी ) पंढरीनाथ पाटील ( पालसई सेवा सहकारी सोसायटी) दिपक भोईर ( नारे सेवा सहकारी सोसायटी ) उल्हास सोगले ( ब्राम्हणगाव सेवा सहकारी सोसायटी ) श्रीराम पठारे ( कळंभे सेवा सहकारी सोसायटी ) या पाच जणांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली असुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सदर निवडणूक ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा माजी उपाध्यक्ष निलेश भोईर यांचे नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती.त्यांचे पॅनेल पुन्हा एकदा बिनविरोध निवडून आले आहे.
वाडा सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक रविंद्र भोसले यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.

