वसंत भोईर,वाडा
वाड्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर,४२ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव,
वाडा तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण आज तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी पंचायत समिती प्रशिक्षण सभागृहात जाहीर केले. यावेळी ४२ ग्रामपंचायती या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.सन २०२५ ते २०३० या काळावधीसाठी हे आरक्षण असणार आहे.वाडा तालुका हा पेसा क्षेत्रात येत असल्याने ८४ ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
तालुक्यातील सांगे नाणे,गालतरे,सुपोंडे,आंबिस्ते बुद्रूक.खानिवली, पिंपळास, आखाडा,कासघर, कळंभे,पीक,कोने,कोनसई, बालिवली, बिलघरऐनशेत, शेले,चिखले,कुयलू,मांगरूळ, बिलावली,मांडवा,उज्जैनी, डोंगस्ते,कुडूस,कोंढले, नारे,खुपरी,उसर,वसूरी बु.देवघर,केळठण,देवळी, हारोसाळे,जामघर,मानिवली, बुधावली,पोशेरी,तुसे,गांधरे, सोनशिव,सारसी व ब्राम्हणगाव या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
आरक्षण सोडतीस वाडा उपविभागीय कार्यालयाचे शिरस्तेदार सुनील लहांगे,नायब तहसीलदार रनजीत शिराळकर यांच्यासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

