रविंद्र राऊळ,मुंबई
उत्तर मुंबईत साजरा झाला रामनवमी सोहळा,
उत्सव रॅली,शोभा यात्रा,भव्य पालखी सोहळा आणि गरबा रजनी अशा अनेकविध धार्मिक कार्यक्रमांनी काल उत्तर मुंबई दुमदूमली होती.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीने जल्लोषात अधिकच भर पडली.
मालाड ( पूर्व ) येथील कुरार गावातील जमरुषी नगरात भव्य रामनवमी उत्सव रॅली काढण्यात आली. मालाडच्या गोरसवाडी येथील भद्रनगर राम मंदिरात श्री राम जन्मोत्सव आयोजित करण्यात आला होता. मालवणी येथील सकल हिंदू समाजातर्फे शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेमध्ये विश्व हिंदू परिषद, दिंडोशी येथील बजरंग दलाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
मालाड ( पश्चिम ) येथील शैलेश नगरात भव्य रामनवमी जन्म उत्सव साजरा करण्यात आला.चारकोप मार्केट येथेही रामनवमी पालखी आणि शोभा यात्रा पार पडली.
बोरीवलीतील गोराई येथील साईबाबा मंदिरात साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले.दहिसर ( पूर्व ) येथील जीएसबी गार्डनमधील गरबा रजनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

