सुरेश वैद्य,सफाळे,
९ एप्रिल रोजी पालघर येथे लोकदरबाराचे आयोजन,
पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुध.९ एप्रिल,२०२५ रोजी दु.३.०० वा.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील,नियोजन समिती सभागृह,पालघर येथे लोक दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकदरबारात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पालघर जिल्ह्यातील जनतेशी थेट संवाद साधणार असून पालघर जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुख या लोकदरबारास उपस्थित राहणार आहेत.पालघर जिल्ह्यातील लोकदरबार कार्यक्रमामध्ये दु.१.०० वाजल्यापासून नागरिकांना टोकन क्रमांक देण्यात येणार आहेत.तरी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या लोकदरबारास उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी केले आहे.

