दीपक मोहिते,
भाग क्र. २,
ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे शेअर बाजार कोसळला,एका दिवसात १७ लाख कोटी डॉलर्सचे नुकसान,
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व अॅलन मस्क या दोघांनी घेतलेल्या विविध निर्णयाविरोधात त्यांच्या देशातील छोटे व्यापारी व जनता आता रस्त्यावर उतरून आंदोलने करू लागली आहे.पण हट्टी स्वभाव असलेले ट्रम्प आपल्या निर्णयात बदल करतील,असे वाटत नाही.दरम्यान ट्रम्प यांना रोखण्यासाठी चिनी ड्रॅगन पुढे सरसावला आहे.चीनच्या सरकारनेही ट्रम्प या निर्णयाला सडेतोड उत्तर दिले आहे.त्यांनीही अमेरिकेच्या उत्पादनावर लावण्यात येणारे शुल्क वाढवले आहे.
दरम्यान ट्रम्प यांना अमेरिकन व्यापारी व लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.ट्रम्प यांच्या निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.काल जगभरातील शेअर बाजार जबरदस्त कोसळला.एका दिवसात सुमारे १७ लाख कोटी डॉलर्सचे नुकसान झाले.तसेच त्यांच्या या घातकी निर्णयामुळे महागाईमध्ये प्रचंड वाढ होऊन प्रगतीचा वेग मंदवणार आहे.त्यामुळे अमेरिकन जनता आता रस्त्यावर उतरली आहे.१९६८ नंतर अमेरिकेमध्ये प्रथमच वस्तूवर लागू करण्यात आलेली ही सर्वात मोठी शुल्कवाढ आहे.त्यांच्या या निर्णयाचा व्हिएतनाम, कंबोडिया या देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर प्रचंड परिणाम होऊन हे दोन्ही देश आर्थिक गर्तेत सापडणार आहेत.ट्रम्प सरकारने व्हिएतनाम – ४६ तर कंबोडिया – ४९ % टॅरिफ लादला आहे.भारताला यापूर्वी १७ % टॅरीफ लागू होता, त्यामध्ये ९ टक्क्याने वाढ करण्यात आली आहे.त्याचा सर्वाधिक फटका कृषीक्षेत्राला बसणार आहे.इतर देशांना लावण्यात आलेल्या टॅरिफच्या तुलनेत आपल्याला लावण्यात आलेला टॅरिफ बरा असल्याचे अर्थतज्ञाचे म्हणणे आहे.मात्र ट्रम्प सरकारच्या या निर्णयामुळे अनेक बड्या राष्ट्राना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.परिणामी बेरोजगारीमध्येही वाढ होईल, अशी भिती व्यक्त होत आहे.हे सर्व उपदव्याप करताना ट्रम्प यांनी औषध उत्पादनाना यातून वगळले असल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
समाप्त,

