संजय नेवे,विक्रमगड
खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडीचा पाडा येथे पाणीटंचाईला सुरुवात,
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असुन ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यावरील विहिरीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.अशा परिस्थितीमध्ये सर्वत्र पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे.
विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडीचापाडा येथील अनेक विहिरींनी तळ गाठले असून या भागातील लोकांची पाण्यासाठी पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. ग्रामपंचायतीने पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
तापमान वाढल्यामुळे पाण्याची पातळी सतत कमी होत चालली आहे. तालुक्यातील काही गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.त्यासाठी तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तयार करणे, आवश्यक असून पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी लोकप्रतिनिधी केली आहे.

