Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, माणुसकीला काळिमा, वा रे चौथी मुंबई ; रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे बाळाचा मृतदेह पिशवीतून नेला, पालघर जिल्ह्याची वाटचाल चौथ्या मुंबईच्या दिशेने सुरू झाल्याचे आपले नेतेमंडळी सतत सांगत असतात. वाढवण बंदर, विमानतळ,बुलेट ट्रेन व मुंबई-वडोदरा जलदगती मार्ग व अन्य विकासकामे प्रस्तावित आहेत.या विकासकामावर लाखो कोटी रु.खर्च करण्यात येत आहेत.मात्र पालघर जिल्हावासीय आजही हलाखीचे जीवन जगत आहेत. पाणी,वैद्यकीय सेवा,शिक्षण व आरोग्य,या मूलभूत गरजापासून ते वंचित आहे. आरोग्य सेवेची पार दुर्दशा झाली आहे.कुपोषणांमुळे दरवर्षी किती बालके मृत्यूमुखी पडतात,याविषयीची आकडेवारी दस्तूरखुद्द जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे नाही.तसेच गरोदरमातांची स्थिती देखील तशीच असल्याचे पाहायला मिळते. मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे जोगलवाडीत वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याला नाशिक…

Read More

दीपक मोहिते, मागील वीस वर्षाचा बॅक लॉग भरून काढू – मुख्यमंत्री फडणवीस, लोकसंख्या वाढीच्या तुलनेत गेल्या वीस वर्षांत या तालुक्यातील लोकांना नागरी सुविधा मिळाल्या नाहीत.त्यामुळे विकासाचा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आता कामाला लागा,आपल्याला विधानसभा निवडणुकीत जसे परिवर्तन घडवले,तसेच परिवर्तन या महानगरपालिका निवडणुकीत घडवायचे आहे,असे उदगार मुख्यमंत्री यांनी वसई येथे झालेल्या कार्यक्रमात काढले.मुख्यमंत्री फडणवीस हे आज वसईच्या दौऱ्यावर आले होते,त्यावेळी ते बोलत होते. वसई येथे वसई- विरार महानगरपालिकेच्या डी.एम.पेटिट इस्पितळाच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण तसेच वसईच्या आ.स्नेहा दुबे यांच्या कार्यालयाच्या उदघाटनासाठी वसईत आले होते.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले,मुंबई महानगरपालिका व आसपासच्या महानगरपालिका क्षेत्रात ज्याप्रकारे विकास झाला,दुर्देवाने तसा तो या…

Read More

दीपक मोहिते, सेनेच्या ( शिंदे गट ) कार्यकारिणीची वसईत बैठक, काल १५ जून रोजी वसईत शिवसेना ( शिंदे गट ) वसई तालुका कार्यकारणीची बैठक पार पडली.सदर बैठक जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या बैठकीला कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.सदर बैठकीस तालुका व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.यंदा वसई विरार शहर महानगरपालिकेत महापौर हा शिवसेनेचाच होणार,असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवायची असा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असला तरी आपण सर्वच्या सर्व जागा…

Read More

तलासरी प्रतिनिधी, तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये वडवली पुनर्वसन शाळेत विद्याथ्यांचा प्रवेश, शैक्षणिक वर्ष २०२५- २६ या शैक्षणिक वर्षातील १६ जून शाळेचा पहिला दिवस,या दिवशी जिल्हा परिषद शाळा वडवली पुनर्वसन शाळेमध्ये ” चला शाळेत जाऊया,” या उपक्रमांतर्गत शाळा प्रवेश मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.यावेळी स्थानिक प्रशासनातील अधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमोल पाठक तहसीलदार तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी व वैभव सापळे गटविकास अधिकारी पंचायत समिती तलासरी तसेच पालक यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.या प्रसंगी नव्याने दाखल झालेल्या ” विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल,” हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत,शालेय गणवेश,पाठ्यपुस्तक,बूट तसेच भोला…

Read More

दीपक मोहिते, आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधावे, राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आज विविध विकासकामाचे उदघाटन करण्यासाठी पालघरच्या दौऱ्यावर येत आहेत.गेल्या महिन्याभरात राज्याचे डझनभर मंत्री पालघरच्या दौऱ्यावर येऊन गेले.यामध्ये सर्वाधिक भरणा भाजपच्या मंत्र्यांचा होता.दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे केवळ प्रताप सरनाईक यांनी हजेरी लावली होती.पालकमंत्री गणेश नाईक एक दिवस आड हजेरी लावत आहेत.आज फडणवीस समवेत भाजपचे अनेक मंत्री पालघर व वसईत येत आहेत. वसईत महानगरपालिकेच्या डी.एम.पेटिट रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या ९० बेडच्या बालरुग्णालयाचे लोकार्पण व वसईच्या आ.स्नेहा दुबे यांच्या कार्यालयाचे उदघाटन,असे दोन कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत.विधानसभेच्या तीन जागा जिंकल्यानंतर फडणवीस प्रथमच वसईत येत आहेत.त्यामुळे त्यांच्या स्वागताची…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न, सामाजिक बांधिलकी जोपासणारे आणि आतंरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउउद्देशीय संस्थाचे पालघर जिल्हा संघटक व राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह म्हणून कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. सदर उपक्रम राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षाची लागवड करून साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोब्रा कमांडो रामदासजी भोगाडे (मेजर), जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष मा. विनायक शेळके, सचिव डॉ. शरद मुकणे, वाचनालय अध्यक्ष कमलजीत धानमेहेर, तसेच,कर्मचारी,वाचक व पर्यावरण मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात विनायक शेळके यांच्या संकल्पननेतून जव्हार मध्ये ” झाडांची भिशी,” या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात…

Read More

वसंत भोईर,वाडा, वाड्यात रक्तदान शिबिराचे आयोजन, जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून वाडा तालुक्यातील ई.पी.एल. कंपनीतर्फेरक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाडा तालुक्यातील ई.पी. एल.कंपनीने जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून वाडा युनिट येथे कै. वामनराव ओक रक्तपेढी ठाणे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावर्षी रक्तदान दिनाची संकल्पना होती ” रक्त द्या, एकत्र येऊन जीव वाचवा “. उन्हाळ्याचे तीव्र तापमान आणि मान्सूनच्या प्रारंभामुळे रक्तदात्यांची संख्या कमी असते,अशा परिस्थितीतही ई पी.एल.कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन ४२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दाखवली. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ई.पी.एल.कंपनी व्यवस्थापन,कामगार व वामनराव ओक रक्तपेढीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी सुरेंद्र…

Read More

दीपक मोहिते, मोबाईलचा वापर मर्यादेतच व्हायला हवा…. प्रसिद्धी माध्यमाच्या जगात मोबाईल व संगणक,या दोन इलेक्ट्रॉनिक वस्तुंना आता अनन्यसाधारण महत्व आले आहे.ते जगभरातील माध्यमे अत्यंत प्रभावीपणे वापरत आहेत.व्हाटसअप व फेसबुक यानी तर जग आपल्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे.या माध्यमामुळे पत्र व तार हा प्रकारच इतिहासात जमा झाला आहे.जगभरात कुठे काय घडले,हे क्षणार्धात आपण घरी बसून पाहू शकतो,इतकी ही माध्यमे प्रभावी ठरली आहेत.त्यामुळे लहान मुले,तरुण-तरुणी,महिला व आबालवृद्ध मंडळी त्याच्या पूर्णपणे आधीन झाले आहेत.एखाद्या वेळी इंटरनेट बंद पडले की आपण अक्षरशः वेडेपीसे होतो. बदलत्या आपण या सर्व माध्यमाच्या इतक्या आहारी गेलो आहोत कि त्यामधून बाहेर पडणे,आता कोणालाही शक्य नाही.असं म्हणतात कि विकास कधीही…

Read More

दीपक मोहिते, ” निवडणूक पर्व,” पालघर जिल्हा परिषद / ८ पंचायत समित्याच्या निवडणुकामध्ये महायुती बाजी मारणार… स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकामध्ये महानगरपालिका निवडणुकासोबत इतर संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.ग्रामीण भागातील जिल्हा परिषदा,पंचायत समित्या, नगरपरिषदा,नगरपंचायती व सहकारी संस्थाचा त्यामध्ये समावेश असेल.या सर्व संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्नशील असतो.त्यामुळे सारेच पक्ष सध्या कामाला लागले आहेत.या सर्व निवडणुका एकाचवेळी घेणे शक्य झाले नाही तर निवडणूक आयोग महानगरपालिका निवडणुका पार पडल्या की निवडणूक आयोग जिल्हा परिषद व पंचायत समित्याच्या निवडणुका जाहीर करेल, अशी शक्यता आहे.जिल्हा परिषदा व पंचायत समित्याच्या निवडणुका मागाहून होणे,सत्ताधारी पक्षाना सोयीचे ठरणार नाही. त्यामुळे त्या महानगरपालिका निवडणुकासोबतच होतील,…

Read More

सुनंदन गोखले,नाशिक रोड नाशिक महानगरपालिका निवडणूक ; प्रभाग रचनेच्या कामावर राजकीय पक्षाचा दबाव असण्याची शक्यता, केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात राजकीय हालचालीना वेग आला आहे. नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण हळूहळू तापू लागले आहे.नाशिकच्या महायुतीमध्ये अंतर्गत बऱ्याच घडामोडी घडू लागल्या आहेत.तर महाविकास आघाडीची घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महापालिकेची प्रभागरचना आपल्याला अनुकूल असावी, यासाठी शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) व भाजप या दोघांकडून छुपे प्रयत्न सुरू झाले आहेत.प्रभागरचना जर अनुकूल असेल तर महानगरपालिकेत आपला विजय सोपा असेल,अशा निर्णयाप्रत हे दोन्ही पक्ष आले आहेत.त्यामुळे प्रशासनाने कितीही निरपेक्षपणे काम करण्याचा प्रयत्न केला तरी प्रभाग…

Read More