जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न,
सामाजिक बांधिलकी जोपासणारे आणि आतंरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउउद्देशीय संस्थाचे पालघर जिल्हा संघटक व राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह म्हणून कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
सदर उपक्रम राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षाची लागवड करून साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोब्रा कमांडो रामदासजी भोगाडे (मेजर), जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष मा. विनायक शेळके, सचिव डॉ. शरद मुकणे, वाचनालय अध्यक्ष कमलजीत धानमेहेर,
तसेच,कर्मचारी,वाचक व पर्यावरण मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात विनायक शेळके यांच्या संकल्पननेतून जव्हार मध्ये ” झाडांची भिशी,” या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये ज्यांना पर्यावरण आवड आहे,त्यांनी प्रत्येक महिन्याला २०० रु.जमा करून वृक्ष लागवड केलेल्या झाडांचे संरक्षण करणे व झाडांची भिशी अंतर्गत,प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या वाढदिवस, लग्नदिन किंवा खास प्रसंगी एक झाड लावण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले.ज्यामुळे वृक्षसंवर्धन होणार असून,सामाजिक भानही निर्माण होईल.
कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली आणि भविष्यातही अशा उपक्रमांत सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

