दीपक मोहिते,
सेनेच्या ( शिंदे गट ) कार्यकारिणीची वसईत बैठक,
काल १५ जून रोजी वसईत शिवसेना ( शिंदे गट ) वसई तालुका कार्यकारणीची बैठक पार पडली.सदर बैठक जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या बैठकीला कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.सदर बैठकीस तालुका व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.यंदा वसई विरार शहर महानगरपालिकेत महापौर हा शिवसेनेचाच होणार,असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवायची असा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असला तरी आपण सर्वच्या सर्व जागा लढवायची तयारी ठेवली पाहिजे,असे अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात सांगितले.कारण सहयोगी पक्ष अधूनमधून मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करत असतो,त्यामुळे आपल्याला गाफिल राहून चालणार नाही. निवडणूक कशा पद्धतीने लढवायची याविषयीचा अंतिम निर्णय आपले नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील.परंतु आपली तयारी असली पाहिजे,असा सूर या बैठकीत उमटत होता. शिवसेनेची अचानक बैठक झाल्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांच्या भुवया वर गेल्या आहेत.

