वाडा प्रतिनिधी,
वाडा नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर,ख़ुशी कम,जादा गम,
वाडा नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंचायत समितीच्या सभागृहात वाड्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व ५० टक्के महिला आरक्षणाची सोडत चीट्ठीच्या माध्यमातून काढण्यात आली.यावेळी प्रभाग क्रमांक -१,२,८,११ हे प्रभाग अनुसूचित जमाती वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून यापैकी प्रभाग क्रमांक-२ व ८ हे अनुसूचित जमाती महिला करता आरक्षित झाले आहेत.तर प्रभाग क्रमांक-१४ हा प्रभाग अनुसूचित जाती महिला असा आरक्षित झाला आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक-३,७,११,१३,१६ व १७ हे प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.प्रभाग क्रमांक -३,७,१७ हे प्रभाग महिला गटासाठी आरक्षित झाले आहेत.तर
४,५,६,९,१०,१२,१५ हे प्रभाग सर्वसाधारण राहिले असून यापैकी प्रभाग क्रमांक-६,९,१५ हे प्रभाग सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.
यावेळी वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

