सुरेश काटे,तलासरी
माकपाच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश,
तलासरी तालुका भाजपचे माजी अध्यक्ष तसेच डहाणु विधानसभा संयोजक विनोद मेढा यांच्या नेतृत्वाखाली तलासरी तालुक्यातील उपलाट पडवळपाडा येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल भाजपात प्रवेश केला.
भारतीय जनता पार्टी तलासरी, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी येथे हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.माकपाचे विलास वाघात,सुरेश वाघात यांच्यासह जवळपास २५ कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजपाचे जि.प.चे माजी सदस्य सुरेंद्र निकुंभ, जेष्ठ नेते बबला धोडी,वडवली सवणे गावाचे उपसरपंच सुनिल टोकरे,नगरसेवक गटनेता राजेश हाडळ,झरी गावाचे उपसरपंच अरविंद भावर,महेंद्र गोवारी,संतोष रांधे,वासू घुटे,शैलेश पाह, सुरेश पडवले,गणपत झाटीया यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

