तलासरी प्रतिनिधी,
तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये वडवली पुनर्वसन शाळेत विद्याथ्यांचा प्रवेश,
शैक्षणिक वर्ष २०२५- २६ या शैक्षणिक वर्षातील १६ जून शाळेचा पहिला दिवस,या दिवशी जिल्हा परिषद शाळा वडवली पुनर्वसन शाळेमध्ये ” चला शाळेत जाऊया,” या उपक्रमांतर्गत शाळा प्रवेश मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.यावेळी स्थानिक प्रशासनातील अधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमोल पाठक तहसीलदार तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी व वैभव सापळे गटविकास अधिकारी पंचायत समिती तलासरी तसेच पालक यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.या प्रसंगी नव्याने दाखल झालेल्या ” विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल,” हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत,शालेय गणवेश,पाठ्यपुस्तक,बूट तसेच भोला भैरव भक्ती फाउंडेशन मीरा-भाईंदर यांच्या सौजन्याने प्रत्येक विद्यार्थ्याला सहा वह्या मोफत वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवानंद ठाकरे,सदस्य संतोष ठाकरे ग्रामपंचायत सदस्य कुंदन ठाकरे,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील,शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व गावकरी उपस्थित होते.

