- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
नदीम शेख, दांडी गावातील नुकसानग्रस्त कुटुंबांना शिवसेनेकडून मदत, गेल्या दोन दिवसांत पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दांडी गावातील २९ घरांची प्रचंड पडझड झाली.अचानक आलेल्या या वादळामुळे कित्येक घरांचे पत्रे उडाले तर अनेक घरातील साहित्याचे अतोनात नुकसान झाले होते. सदर बाब दांडी गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्याकडे मांडल्यानंतर व मदतीची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर त्यांनी लगेच नुकसान झालेल्या या एकूण २९ घरातील कुटुंबांना दिलासा मिळावा,यासाठी गावात पत्र्यांचे वाटप केले. राजकीय पक्षात कार्यकर्ते खूप असतात जे निवडणुकीच्या वेळी स्वतःच्या पक्षाला मतदान मिळावे,अशी अपेक्षा व्यक्त करतात.परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेला घरांना केवळ तोंडी दिलासा देण्याऐवजी प्रत्यक्ष जाऊन मदत मिळाल्यामुळे गावातील ग्रामस्थांनी शिवसेना…
दीपक मोहिते, कृषी विभागाचा नाकर्तेपणा, सरकारचे आजवरचे कांदेविषयक धोरण शेतकऱ्यांसाठी ठरले मारक, राज्य व केंद्र सरकारच्या कृषी उत्पन्नाच्या दिशाहीन धोरणाचा राज्यातील कांदे,सोयाबीन,दूध व अन्य उत्पन्न घेणारे शेतकरी आज अडचणीत आले आहेत.” नेमेची येतो पावसाळा,” या उक्तीनुसार कांदे उत्पादक शेतकरी दरवर्षी संकटात सापडत असतात.यंदाही तेच झाले आहे.त्याचा फटका महायुती सरकारला गेल्यावर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बसला. कांदा,हे कृषी उत्पन्न,हे जीवनावश्यक वस्तूच्या यादीतील कृषी उत्पन्न,१९९९ साली जीवनावश्यक वस्तूच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.त्यानंतर २००४ मध्ये तो यादीतून वगळण्यात आला.त्यानंतरच्या काळात विविध कृषी उत्पन्नावर अनेकदा निरनिराळी बंधने लादली गेली.आजवर या उत्पन्नावर अनेक निर्बंध जी लादण्यात आली,त्यामध्ये परराष्ट्र व्यापार कायद्याचा देखील समावेश आहे.केंद्र सरकारने…
दीपक मोहिते, आदिवासी समाजासाठी उदंड झाल्या योजना,पण समाज आजही अंधारात चाचपडतोय, राज्यनिर्मितीच्या ६५ वर्षात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आजवर शेकडो योजना कार्यान्वित करण्यात आल्या. पण आदिवासीच्या जीवनात किती बदल घडून आले.तसेच हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आला का ? हे दोन्ही विषय संशोधनाचे आहेत.आदिवासी समाजासाठी विविध योजना जाहीर होत असतात,तसेच अर्थसंकल्पात तरतूदीही करण्यात येत असते.पण प्रत्यक्षात हा निधी कुठे वापरला जातो,हे आजवर कधीच उजागर होऊ शकले नाही.तसेच या समाजात किती परिवर्तन झाले,याचा थांगपत्ता नाही. आता पुन्हा नव्याने देशातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत ” धरती आबा लोकसहभाग…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” बडगुजर यांनी नितेश राणे यांचा पोपट केला, बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता समवेत पार्टी करणारे सुधाकर बडगुजर हे आज कॅबिनेटमंत्री नितेश राणे यांच्या नाकावर टिच्चून भाजपवासी झाले.त्यांच्या या प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांची अवस्था पाहून अक्षरशः कींव करावीशी वाटली.म्हणून राजकारणात वावरताना खूप सांभाळून बोलावे लागते,वागावे लागते.नितेश राणे हे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात.ते जी काही भूमिका घेतात,त्यांच्या प्रत्येक भूमिकेला स्वपक्षातूनच विरोध होत असतो.आजच्या घटनेने त्यांचे सर्वत्र हसं झाले.गिरीश महाजन यांनी नाशिक महानगरपालिका जिंकण्यासाठी बडगुजर यांचे कार्ड वापरण्याचे ठरवले व प्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला.यावेळी महाजन यांनी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ” अबकी बार शंभर पार,” अशी घोषणा…
जव्हार प्रतिनिधी, ग्रामस्थाच्या श्रमदानातून विहिरीची यशस्वी दुरुस्ती, पावसाळा सुरू झाला की अनेक ग्रामीण भागांतील पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र होत असतो. या पार्श्वभूमीवर जव्हार तालुक्यातील पिंपळशेत/कोतीमाळ गावात नागरिकांनी स्वखर्चातून आणि श्रमदानातून एक प्रेरणादायी उपक्रम राबवत नादुरुस्त विहिरीची दुरुस्ती करण्यात आली.या उपक्रमामुळे गावात शुद्ध आणि सुरक्षित पाण्याचा स्रोत पुन्हा कार्यान्वित झाला आहे. गावातील जुनी विहीर गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत पडून होती. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाण्याचा वापर करावा लागत असे. परिणामी आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती.याचा थेट फटका महिला,लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत होता. या समस्येची दखल घेत सामाजिक कार्यकर्ता कु. कमलेश पागी यांनी पुढाकार घेऊन गावातील…
वसंत भोईर,वाडा खेकड्यांसाठी ( मुठे ) खवय्यांची सर्वत्र भटकंती सुरू, पावसाच्या दमदार आगमना नंतरही खेकड्यांचे ( मुठे ) बाजारात अद्याप आगमन झालेले नाही.खेकड्यांची चव घेण्यासाठी आतुर असलेल्या खवय्यांवर खेकड्यांच्या शोधात बाजारपेठांत, गांव-पाड्यात तसेच रात्रीच्या वेळी पळींदा व बॅटरी घेऊन रानमाळावर भटकंती करण्याची वेळ आली आहे. पावसाच्या आगमनानंतर जमिनीत ओलावा निर्माण झाला की खोलवर बिळांमध्ये असलेले मुठे बाहेर पडतात. अत्यंत चपळ असलेल्या या मुठ्यांना पकडून ते शिजवून जेवणातील एक चांगला गुणकारी व चवदार खाद्य पदार्थ भाजी म्हणून बनवून खाण्यात येतो.जून महिन्याच्या दुस-या आठवड्यात पाऊस अधूनमधून सुरु झाला आहे. जंगल भागात व माळरानावर गवताचे प्रमाण अधिक झाले आहे.खेकड्यांचे खाद्य असलेले गवत अगदी…
दीपक मोहिते, आयुक्त सुस्त ; करदाते नागरिक बेहाल, वसई व नालासोपाऱ्यामध्ये कोणताही पक्ष निवडून आला तरी नागरिकांचे हाल मात्र संपायचे नांव घेत नाही.गेली अनेक वर्षे ही दोन्ही शहरे दरवर्षी जलमय होत असतात. नियोजनशून्य बांधकामे,नाल्यात होणारी अनधिकृत बांधकामे, पावसाळी पाणी वाहून नेणारे नाले अरुंद होणे व नालेसफाईच्या नावाखाली मनपा अधिकारी, लोकप्रतिनिधी व ठेकेदारांकडून होणारी लूट आदी कारणामुळे या दोन्ही शहरातील नागरिकांना दरवर्षी अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागते. यंदाही लोकप्रतिनिधीनी नालेसफाईच्या कामाची पाहणी करताना शेकडो सेल्फी काढले व ते सोशल मिडियावर पोस्ट केले.पण गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने या लोकप्रतिधीनी व आयुक्ताचे चांगलेच वस्त्रहरण केले.नालासोपारा शहरातील अनेक नागरिकांची घरे व…
वसंत भोईर,वाडा शुद्ध बियाणे व समृद्ध शेती याविषयी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी ? पालघर जिल्ह्यात मान्सून नुकताच दाखल झाला आहे.आता पेरण्यांची लगबग सुरू होणार आहे.पिकांची अधिक वाढ होऊन चांगले उत्पादन होण्यासाठी गुणवत्ता पूर्व बियाणे आवश्यक आहे. त्यामुळे बियाण्यांची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेते यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून,कंपनीच्या जाहिराती वाचून शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी करू नये.बियाणे खरेदी करताना खबरदारी घ्यावी,खरेदी करावयाचे बियाणे वाण,जात यांची आपल्या भागासाठी शिफारस केली आहे का,हे जाणून घ्यावे.निवडलेले वाण कोणत्या किडीसाठी अथवा रोगासाठी विकारक्षम किंवा सहनशील आहे का ? निवडलेले वाण किती कालावधीसाठी आहे,त्याची वैशिष्ट्ये कोणती ? याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. शेतात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी बियाणे…
वसंत भोईर,वाडा सावरोली पुलाला पडले तडे,कांबरे – वासिंद मार्ग धोकादायक, वाडा- शहापूर- भिवंडी या तीन तालुक्यांना जोडणारा काबांरे- वाशिंद मार्गावरील तानसा नदीवरील सावरोली पुलाला दोन दिवसापूर्वी तडे गेले आहेत.त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाडा- भिवंडी महामार्गाची पार दुरावस्था झाली असल्यामुळे वाडा, शहापूर, ठाणे येथून येणारी सर्व वाहने याच मार्गे ये-जा करत असतात. शिवाय हा मार्ग अरुंद असल्याने या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.तडे गेल्यामुळे या पुलाला आता धोका निर्माण झाला आहे. या मार्गाने होणारी अवजड वाहनांची वाहतूक त्वरित थांबविण्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आज संध्याकाळीच मला व्हाट्सअपवर फोटो आले आहेत.मी उद्याच या ठिकाणी जाऊन…
दीपक मोहिते, ” निवडणूक पर्व, ” मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यात निवडणुकीचे बिगुल वाजवले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल वसईच्या दौऱ्यावर आले होते.त्यांनी महानगरपालिकेच्या इस्पितळाच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण करून एकप्रकारे निवडणुकीचे बिगुलच वाजवले आहे.वसईकर नागरिकांसाठी आधुनिक दर्जाचे इस्पितळ हा अत्यंत जिव्हाळ्याचा तसेच संवेदनशील असा विषय आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ९० बेडच्या विस्तारीत कक्षाचे लोकार्पण करून वसईकर नागरिकांची मने जिंकली आहेत.या घटनेचा आगामी निवडणुकीच्या निकालावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.तसेच पाणी व अनेक प्रलंबित असलेली अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी विविध वित्तीय संस्थाकडून निधी उभारण्यावर भर दिला आहे. मेट्रोच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक प्रयत्नाला लागले आहे. तसेच…
