वसंत भोईर,वाडा
सावरोली पुलाला पडले तडे,कांबरे – वासिंद मार्ग धोकादायक,
वाडा- शहापूर- भिवंडी या तीन तालुक्यांना जोडणारा काबांरे- वाशिंद मार्गावरील तानसा नदीवरील सावरोली पुलाला दोन दिवसापूर्वी तडे गेले आहेत.त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वाडा- भिवंडी महामार्गाची पार दुरावस्था झाली असल्यामुळे वाडा, शहापूर, ठाणे येथून येणारी सर्व वाहने याच मार्गे ये-जा करत असतात. शिवाय हा मार्ग अरुंद असल्याने या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.तडे गेल्यामुळे या पुलाला आता धोका निर्माण झाला आहे. या मार्गाने होणारी अवजड वाहनांची वाहतूक त्वरित थांबविण्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आज संध्याकाळीच मला व्हाट्सअपवर फोटो आले आहेत.मी उद्याच या ठिकाणी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेऊन योग्य ती कारवाई करू.
– बळवंत कांबळे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,शहापूर,
अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे सावरोली पुलाला तडे गेले असून पुलाला धोका निर्माण झाला आहे. अशीच अवजड वाहतूक चालू राहिली तर पूल कोसळू शकतो. संभाव्य धोका लक्षात घेऊन या मार्गावरील जड मालवाहतूक त्वरित बंद करावी.
– कैलास भोईर,ग्रामस्थ
.

