- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- गेल्या ४० दिवसापासून राज्यातला पाऊस गायब, भविष्यात अस्मानी संकट,
- सारासार विचार करण्याची गरज आहे…
- समाजात इतकी असंवेदनशीलता येते तरी कुठून ?
- ‘ अमृत सक्षम,’ मधून हरित उद्योजकतेला चालना,
- चारोटी येथे स्मार्ट मीटर विरोधात रास्ता रोकॊ, हजारो महिला रस्त्यावर,
- अबू सालेमची सुटका नाही, सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली,
- मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर वाहनाच्या प्रचंड रांगा,
- जांभूळ विहीर पूर्व येथे भंगार दुकानामुळे रहिवासी त्रस्त,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” निवडणुक रणसंग्राम,” बविआ व शिवसेना ( उबाठा ), गटात प्रचंड अस्वस्थता… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने स्पष्ट संकेत दिले असून या निवडणुका डिसें.किंवा जाने.महिन्यात होण्याची शक्यता आहे.या निवडणुका तीन टप्यात होणार असून त्या दृष्टीने निवडणूक आयोग कामाला लागले आहे.महत्वाचा विषय म्हणजे प्रभाग रचनेचा तिढा नुकताच सुटला असून विद्यमान सरकारने प्रस्तावित केलेल्या प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रभाग ११ ने वाढण्याची शक्यता आहे.गेल्या निवडणुकीत एकूण ११५ जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या,त्यामध्ये आता नव्याने ११ जागा वाढणार आहेत.यंदा एकूण १२६ जागावर निवडणुका होणार आहेत.गेल्या निवडणुकीत बविआ – १०८,शिवसेना – ०५,भाजप -०१,मनसे -०१,…
दीपक मोहिते, निवडणुकीचा रणसंग्राम, स्थानिक स्वराज्य निवडणुका ; सर्वसधारणपणे नोव्हें.किंवा डिसें.मध्ये होतील… निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार,स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सर्वसाधारणपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबर दरम्यान होणार आहेत.या निवडणुकांमध्ये व्हिव्हिपॅट मशीनचा वापर करण्यात येणार नाही,तसेच निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेस नुकतीच मंजुरी मिळाल्यानंतर,निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका नुकत्याच फेटाळल्या,त्यामुळे निवडणुका आता नव्या आराखड्यानुसार पार पडणार आहेत.राज्यातील मुंबई,पुणे, नाशिक,ठाणे,नागपूर,नवी मुंबई,पिंपरी चिंचवड,वसई-विरार, कल्याण-डोंबिवली,छत्रपती संभाजीनगर या प्रमुख महापालिकेच्या प्रभाग रचनेत बदल करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या बाबतीत मात्र पूर्वीप्रमाणेच २२७ प्रभाग कायम ठेवण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हे २३६ प्रभागांपर्यंत…
वसंत भोईर,वाडा वाडा तालुक्यात राख्यांनी बाजारपेठा सजल्या, रक्षाबंधन सणासाठी वाडा तालुक्यातील वाडा शहर, कंचाड,खानिवली,शिरीष पाडा,कुडूस,अबिटघर परिसरातील बाजारपेठेतील अनेक दुकाने विविध प्रकारच्या राख्यांनी फुलली आहेत.भाऊरायाच्या पसंतीस उतरेल,अशी राखी घेण्यासाठी महिलांची बाजारात लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे लाडक्या बहिणींसाठी विविध भेटवस्तू खरेदी करण्यात युवा वर्ग व्यग्र झाला आहे. यंदा महागाईमुळे राख्यांच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे राख्या विक्रेत्यांनी सांगितले. कुंदनवर्क आणि साध्या राख्यांना जास्त मागणी आहे. चिमुकल्यांसाठी लाइटिंग राख्या,छोटा भीम,डोरो माॅन, मोटू पतलू,श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्या आहेत.लाइटिंग,लाकडी पपेट, कडा राखीसह पारंपारिक देव राखीला ही मागणी आहे. यंदाही स्पिनर लाइटिंग राकेश असलेले बटन दाबले की विविध रंगीत लाइटिंग…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आता ती वेळ निघून गेली आहे… आज अखेर अपेक्षेनुसार बहुजन विकास आघाडी व शिवसेना ( उबाठा ) गटाला गळती लागली.ही केवळ सुरुवात आहे,पुढे फार मोठे महाभारत घडणार आहे.माजी नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्याला का सोडून जाताहेत,याचा विचार आता करून काहीही साध्य होणार नाही.मी या विषयावर दोन वर्षांपासून लिहीत होतो.पण नेतेमंडळीनी त्याची दखल घेतली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाला भाजपने अस्मान दाखवले.पण त्यानंतरही या दोन्ही पक्षात पराभवाची कारणमीमांसा व आत्मचिंतन झाले नाही.पूर्वीकाळी लोकांसमोर पर्याय नव्हता,त्यामुळे राजकीय समीकरणे बदलू शकली नाहीत.पण भाजपने विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली व या दोन्ही पक्षाच्या नेत्याच्या पायाखालची जमीन सरकली.आजपर्यंत नेतेमंडळी आम्ही ५०…
दीपक मोहिते, ” विध्वंस,” भाग क्र.३, गरजेपेक्षा अधिक पैसा आला की तो पापाला आमंत्रण देत असतो… एकेकाळी वसई विरार परिसराची ओळख,ही ” मुंबईची फूफ्फुसे,” अशी होती,ती निकामी करण्याचे पाप काही मूठभर बिल्डर्सनी केली व वसईच्या वाताहतीला सुरुवात झाली.अल्पावधीत ” ऐतिहासिक वसई,” ची ओळख ” गुन्हेगारीचे माहेरघर म्हणजे वसई,” अशी होत गेली.वसईचे नामकरण करणाऱ्या या टोळीत कालांतराने अनेक तरुण मोठ्या संख्येने सामील होत गेले.जमिनी हडप करणे,अनधिकृत बांधकामे उभारणे,या कामातून रग्गड पैसा मिळतो,हे लक्षात आल्यानंतर या टोळीत हवशे नवश्याची संख्या वाढत गेली.कालांतराने या गोरखधंद्यात पोलीस, नगरपरिषदेचे व महसूल विभागाचे कर्मचारी देखील सामील होत गेले.त्यामुळे लचके तोडण्यास वेगाने सुरुवात झाली.२००० पर्यंत वसई,नालासोपारा व…
दीपक मोहिते, ” भयावह वास्तव,” काश्मीर खोरे पून्हा अशांत होण्याच्या वाटेवर,केंद्र सरकार ठरले अपयशी, केंद्र सरकारने आजच्या दिवशी ( ५ ऑगस्ट ) वादग्रस्त ३७० कलम रद्द केले. त्या घटनेला सहा वर्षे पूर्ण झाली. पण काश्मीर खोऱ्यात शांतता नांदली का ? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असेच मिळते. गेल्या महिन्यात २६ निष्पाप नागरिकांची काश्मीर खोऱ्यातील पहलगाम या निसर्गरम्य ठिकाणी दहशतवाद्द्यानी निर्घृण हत्या केली. सहा वर्षांपूर्वी केंद्रसरकारने ३७० कलम रद्द केले.त्यामुळे भारतीय जनतेने जल्लोष केला.आता खोऱ्यात शांतता नांदेल,पर्यटनाला चालना मिळेल व स्थानिकांना रोजगार मिळेल,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. केंद्र सरकार देखील काश्मीर खोऱ्यात शांतता असुन पर्यटकानी मोठ्यासंख्येने काश्मीरला यावे,असे आवाहन करण्यास सुरुवात केली.पण…
दीपक मोहिते, चार वर्षांपूर्वी आदर्श सेवाभावी व्यक्तिमत्व हरपले, श्री गजानन महाराज देवस्थान ट्रस्ट,शेगावचे अध्यक्ष शिवशंकर भाऊ पाटील यांचे दिर्घकाळाच्या आजारपणानंतर चार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी निधन झाले.गेली पाच दशके भाऊंनी देवस्थानची सेवा केली.निस्वार्थपणा, पारदर्शकता सेवाभावी व देशाप्रती प्रेम, हे गुण त्यांच्या ठायी ठायी होते.गोरगरिबांना मदत,रुग्णांची सेवा व संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण,आरोग्य,इ.क्षेत्रात अमूलाग्र कामगिरी त्यांनी बजावली.संपूर्ण हयातीमध्ये त्यांनी स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व दिले.शेगाव परिसरात आपण ते अनुभवतो.संस्थेतर्फे करण्यात येणारे अन्नदान,हा नक्कीच अभ्यासाचा विषय आहे.नीटनेटकेपणा, कामाचे योग्य व्यवस्थापन व नियोजन,यावर त्यांचा भर असायचा.कोरोना काळात संस्थेला कोविड सेंटर उभे करण्यासाठी सरकारने दहा कोटी रु. दिले.परंतु त्यांनी ते सेंटर अवघ्या दोन कोटी रु.मध्ये उभे केले व…
वसंत भोईर,वाडा शिक्षकांनी केवळ ज्ञानदान नव्हे तर मूल्यसंस्काराची जबाबदारी पार पाडली पाहीजे, सरकारी शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्याप्रति प्रामाणिक, निस्पृह व समर्पित असतात. त्यांनी केवळ ज्ञानदान नव्हे तर मूल्यसंस्कारांची जबाबदारी पार पाडली पाहीजे.,असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वारे गुरूजी यांनी चिंचघर येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात शिक्षकांना मार्गदर्शन करतांना गुरूतत्व २०२५ या कार्यक्रमात केले. गुरूतत्व २०२५ या कार्यक्रमात पुढे बोलतांना वारे गुरजीं म्हणाले,विद्यार्थ्यांच्या समृद्ध भविष्यासाठी शिक्षकांनी भेदभाव न करता केवळ त्यांच्या उज्ज्वलतेसाठी काम करावे.हेच गुरूतत्वचे खरे मर्म आहे.शाळेतील बहुभाषिक विद्यार्थी,दुर्गम भाग आणि अपु-या भौतिक सुविधा या बाबी आव्हान नसून त्याला संधी मानून काम केले पाहीजे. प्रतिकूल परिस्थितीला नावे न ठेवता,आहे ती परिस्थिती…
सुरेश काटे, तलासरी, तलासरीत मिनी मॅरेथॉन २०२५,स्पर्धेचे आयोजन, दरवर्षी 3 ऑगस्ट रोजी आदिवासी प्रगती मंडळ तलासरी,आयोजित कॉ.शामराव परुळेकर स्मृती प्रित्यर्थ मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन काल करण्यात आले होते.या स्पर्धेचे यंदाचे हे १२ वे वर्ष आहे. या स्पर्धेत संस्थेच्या सर्व शाखांमधून एकूण ३४० विद्यार्थी सहभागी झाले होते. ही मिनी मॅरेथॉन प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयात अशा ४ गटात घेण्यात आली. मॅरेथॉनचे उद्घाटन आ.विनोद निकोले,नगराध्यक्ष सुरेश भोये व रावजी कुऱ्हाडा यांच्या हस्ते कॉ.शामराव परुळेकर,कॉ. गोदावरी परुळेकर व स्व.कॉ.लहानू कोम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. स्पर्धेत सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांना आ.विनोद निकोले यांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी प्राचार्य डॉ.बी.ए. राजपूत,संदीप वावरे व सर्व…
वाड्यात आठवडाभर पावसाची दांडी,शेतकरी चिंतेत, वाड्यात गेल्या आठवड्या पासून पावसाने दांडी मारली असून भात लागवड केलेली शेतजमिनी सध्या कोरड्या पडल्या आहेत.शेतजमीन पावसाअभावी सुकून भेगा पडून रोपाची मुळं तुटण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. भात लागवड केल्याच्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे शेतजमिनी पूर्णतः सुकून तडकू लागल्या आहेत.भातरोपे कोमजून गेली आहेत.याचा विपरित परिणाम भात पिकावर होण्याची शक्यता आहे.पाऊस काही दिवसात पडला नाही,तर भातशेतीचे मोठे नुकसान होईल अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. वाडा तालुक्यात सध्या गरवी भातशेतीच्या तुलनेत हळवार भातशेती मोठ्या प्रमाणात करण्यात येते.यात मोठे क्षेत्र वनपट्ट्यात येत असून रानमाळासह डोंगरदऱ्यातही मोठ्या प्रमाणावर हलवार भातपिकाची लागवड केली जाते.हलवार शेतजमीन ही पावसावर…
