दीपक मोहिते,
” निवडणुक रणसंग्राम,”
बविआ व शिवसेना ( उबाठा ), गटात प्रचंड अस्वस्थता…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने स्पष्ट संकेत दिले असून या निवडणुका डिसें.किंवा जाने.महिन्यात होण्याची शक्यता आहे.या निवडणुका तीन टप्यात होणार असून त्या दृष्टीने निवडणूक आयोग कामाला लागले आहे.महत्वाचा विषय म्हणजे प्रभाग रचनेचा तिढा नुकताच सुटला असून विद्यमान सरकारने प्रस्तावित केलेल्या प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रभाग ११ ने वाढण्याची शक्यता आहे.गेल्या निवडणुकीत एकूण ११५ जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या,त्यामध्ये आता नव्याने ११ जागा वाढणार आहेत.यंदा एकूण १२६ जागावर निवडणुका होणार आहेत.गेल्या निवडणुकीत बविआ – १०८,शिवसेना – ०५,भाजप -०१,मनसे -०१, असे बलाबल होते.
खालील प्रभाग टिकवणे, बविआ,मनसे,सेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या सर्व पक्षांना कठीण होणार आहे.
१४,१५,१८,२४,३५,३८,
३९,४१,४२,४३,४४,४५,४६,
५३,५६,६३,६६,६७,६८,७०,
७१,७२,७३,७४,७५,७९,८१,
८४,८६,८७,८८,८९,९०,९२,
९७,९८, ( प्रविणा ठाकूर, बिनविरोध ) ९९,१०१,१०४,१११,११४,
११५, ( एकूण ४२ जागा )
उर्वरित जागांवर गेल्या खेपेला बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य घेत विजय मिळवला होता. पण लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रत्येक प्रभागात नजरेत भरतील अशी मते घेतल्यामुळे ही निवडणूक आता बविआ व शिवसेनेला ( उबाठा ) सोपी राहिलेली नाही.अशा परिस्थितीत मोठ्याप्रमाणात आउटगोइंग सुरु झाल्यामुळे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. येणाऱ्या काही दिवसात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहे.नायगाव व जुचंद्र, या भागात धरेंद्र कुलकर्णी व नायगाव पश्चिम भागात नितीन ठाकूर हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये सामील झाल्यामुळे बहुजन विकास आघाडी हा या दोन्ही विभागात क्षीण झाल्याचे दिसून आले आहे.

