दीपक मोहिते,
चार वर्षांपूर्वी आदर्श सेवाभावी व्यक्तिमत्व हरपले,
श्री गजानन महाराज देवस्थान ट्रस्ट,शेगावचे अध्यक्ष शिवशंकर भाऊ पाटील यांचे दिर्घकाळाच्या आजारपणानंतर चार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी निधन झाले.गेली पाच दशके भाऊंनी देवस्थानची सेवा केली.निस्वार्थपणा,
पारदर्शकता
सेवाभावी व देशाप्रती प्रेम,
हे गुण त्यांच्या ठायी ठायी होते.गोरगरिबांना मदत,रुग्णांची सेवा व संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण,आरोग्य,इ.क्षेत्रात अमूलाग्र कामगिरी त्यांनी बजावली.संपूर्ण हयातीमध्ये त्यांनी स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व दिले.शेगाव परिसरात आपण ते अनुभवतो.संस्थेतर्फे करण्यात येणारे अन्नदान,हा नक्कीच अभ्यासाचा विषय आहे.नीटनेटकेपणा,
कामाचे योग्य व्यवस्थापन व नियोजन,यावर त्यांचा भर असायचा.कोरोना काळात संस्थेला कोविड सेंटर उभे करण्यासाठी सरकारने दहा कोटी रु. दिले.परंतु त्यांनी ते सेंटर अवघ्या दोन कोटी रु.मध्ये उभे केले व उर्वरित रक्कम त्यांनी सरकारला परत केली.हल्लीच्या काळात असं कुठे पाहायला मिळेल का ? पण भाऊंनी ते करून दाखवले.श्री शेगाव संस्थान,आज देशभरात नावारूपाला आले आहे.येथे गरीब व श्रीमंत,असा भेदभाव नाही.संस्थांनच्या कारभारात पारदर्शकता व सचोटीपणा असावा,याकडे त्यांचा नेहमीच कटाक्ष असायचा.आयुष्यभर ते साधे जीवन जगले.भाऊ गेले,पण ते आम्हा गजानन महाराजांच्या भक्तांच्या कायम आठवणीत राहतील.भाऊ,आम्हा सर्वांना पोरके करून गेलात.लाखो भक्त गेली चार वर्षे दुःखात आहेत.तुमच्या आत्म्याला शांती मिळो,अशी गजानन महाराजाच्या चरणी प्रार्थना,
ओम शांती,शांती,शांती….

