दीपक मोहिते,
निवडणुकीचा रणसंग्राम,
स्थानिक स्वराज्य निवडणुका ; सर्वसधारणपणे नोव्हें.किंवा डिसें.मध्ये होतील…
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार,स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सर्वसाधारणपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबर दरम्यान होणार आहेत.या निवडणुकांमध्ये व्हिव्हिपॅट मशीनचा वापर करण्यात येणार नाही,तसेच निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत.
ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेस नुकतीच मंजुरी मिळाल्यानंतर,निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका नुकत्याच फेटाळल्या,त्यामुळे निवडणुका आता नव्या आराखड्यानुसार पार पडणार आहेत.राज्यातील मुंबई,पुणे, नाशिक,ठाणे,नागपूर,नवी मुंबई,पिंपरी चिंचवड,वसई-विरार, कल्याण-डोंबिवली,छत्रपती संभाजीनगर या प्रमुख महापालिकेच्या प्रभाग रचनेत बदल करण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेच्या बाबतीत मात्र पूर्वीप्रमाणेच २२७ प्रभाग कायम ठेवण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हे २३६ प्रभागांपर्यंत वाढवण्यात आले होते,मात्र महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा २२७ प्रभाग रचना करण्यात आली.या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते,पण ते फेटाळण्यात आले.त्यामुळे आता मुंबईत जुन्याच रचनेनुसार निवडणुका होणार आहेत.
चार सदस्यीय प्रभाग रचनेची अंमलबजावणी
राज्य निवडणूक आयोगाने “अ,” ” ब,” आणि ” क, ” वर्गातील महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
“अ,” वर्ग महापालिका – पुणे, नागपूर
” ब,” वर्ग महापालिका – ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड
” क,” वर्ग महापालिका – नवी मुंबई,वसई-विरार,छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली,
या प्रभाग रचनेनुसार नागरिकांनी आपली तयारी सुरू ठेवावी,असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका राज्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत.
निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत स्पष्ट संकेत दिल्यानंतर राजकीय पक्षाच्या हालचालीना चांगलाच वेग आला आहे.

