Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” जल,जमीन व जंगल ; अस्मानी संकट घोंगावण्यास सुरुवात, गेल्या काही वर्षात मानवाने जल,जमीन व जंगलाचे लचके बेसुमार पद्धतीने तोडले.त्याचे दृष्यपरिणाम आता दिसू लागले आहेत.मानवी जीवनात या तिन्ही नैसर्गिक संसाधनांला अनन्यसाधारण महत्व असताना,मूठभर धनदंडग्यांना झुकते माप देत सरकारने सध्या मानवाला देशोधडीला लावण्याचे धोरण अवलंबले आहे.जमिनीची भूक काही मिटता नाही,तर ९० च्या दशकापासून जल व जंगल यावर सरकार व उद्योगसमूहांची वक्रदृष्टी पडू लागली आहे.त्यामुळे अवघ्या ४० वर्षात ही सारी नैसर्गिक संसाधने हळूहळू इतिहासजमा होऊ लागली आहेत.” विकासासाठी जमिनीचे संपादन,” या गोंडस नावाखाली शेती/ बागायतीच्या सुपीक जमीनी सरकारने बहुराष्ट्रीय उद्योगसमूहांच्या घश्यात घालण्याचे धोरण अवलंबले.सरकारच्या या विनाशकारी धोरणामुळे ग्रामीण भागातील…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रँटलाईन,” एकनाथ शिंदे व अजित पवार यांची सध्याची अवस्था ” सहनही होत नाही,आणि सांगताही येत नाही,” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप व शिवसेनेचा ( एकनाथ शिंदे गट ) चांगलाच बोलबाला राहिला.त्यांच्या युतीने २९ पैकी २६ महानगरपालिका जिंकत शहरी भागातही आम्हीच ” दादा,” असल्याचे दाखवून दिले आहे.त्यांच्या महायुतीमध्ये असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीत साफ पालापाचोळा झाला.ज्या पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका जिंकण्याची त्यांनी स्वप्ने पाहिली होती,ती भाजपने पार धुळीला मिळवली.अजित पवार यांचा उद्धटपणा, सहकारी मंत्र्यांचा मनमानी कारभार व मुलाचे प्रताप,अशा तीन कारणामुळे देवाभाऊंने या निवडणुकीत त्यांना उखडून फेकून दिले. ज्या सत्तेसाठी एकनाथ शिंदे व…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मायबाप सरकारच भूमिपुत्रांना उध्वस्त करू पाहत आहे… गेल्या काही वर्षात केंद्र व राज्य सरकारने पालघर जिल्ह्यात स्थानिक भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारे अनेक विनाशकारी प्रकल्प लादले.या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी संपादीत करताना अनेक भूमीपुत्रावर भूमिहीन होण्याची पाळी आली.सरकार त्यांच्या केवळ जमिनी संपादित करण्यावर थांबले नाही,तर त्यांनी समुद्रातही अतिक्रमण केले.शेतकरी भूमिहीन तर मच्छीमार समाज रोजगारापासून वंचित अशी परिस्थिती या जिल्ह्यात निर्माण झाली.यासर्व प्रकल्पामध्ये वाढवण बंदर व्यतिरिक्त मुरबे येथे नव्याने होऊ घातलेले जिंदाल उद्योग समूहाचे प्रस्तावित खाजगी बंदर,रिलायन्स टेक्स्टाईल पार्क,समृद्धी व मुंबई – वडोदरा द्रुतगती मार्ग,प्रस्तावित विमानतळ व चौथी मुंबई,तसेच यापूर्वी झालेले तारापूर अणू ऊर्जा प्रकल्प टप्पा – १ व टप्पा…

Read More

दीपक मोहिते, वसई विरार उपप्रदेशात ” ऑपरेशन लोटस,” राबवणे,हा आततायीपणा ठरेल… वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे नेते माजी हितेंद्र ठाकूर यांनी स्वतः जातीने कुरुक्षेत्रात उतरून भाजपला यशस्वीपणे रोखले व सत्ता स्थापणे इतपत बहुमत मिळवले.पण,आता भाजप बहुजन विकास आघाडीच्या काही नगरसेवकांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.भाजपने कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे ” ऑपरेशन लोटस,” या वसई विरार उपप्रदेशात फुलणे कदापी शक्य नाही.त्यांनी तसा प्रयत्नही करू नये.बहुजन विकास आघाडीतून जी नाराज मंडळी भाजपमध्ये गेली, त्यांना वसईच्या मतदारांनी साफ नाकारले.हे केवळ ठाकूर रणांगणात स्वतः जातीने उतरल्यामुळे शक्य झाले.जर या निवडणुकीची धुरा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांवर सोपवली…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नॅशनल डेस्कसाठी… आता सर्वच राजकीय पक्षासमोर आपले अस्तित्व टिकवण्याचे आव्हान… राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.पहिल्या टप्यात नगरपरिषदा व नगर पंचायती व दुसऱ्या टप्यात महानगरपालिका,अशा निवडणूका पार पडल्या.या निवडणुकामध्ये अपेक्षेप्रमाणे महायुतीमधील भाजपने घवघवीत यश मिळवले.एकूण २९ महानगरपालिकापैकी भाजपने ठाणे,लातूर,भिवंडी व वसई – विरार या चार महानगरपालिका वगळता सर्वच्या सर्व आपल्या खिश्यात घातल्या.ठाणे येथे शिंदे गटाने वर्चस्व मिळवले तर भिवंडी, लातूर व परभणी या तीन महानगरपालिका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे गेल्या. या निवडणुकीत देशाचे लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे लागले होते.या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव व राज या दोघा ठाकरे बंधूनी सतरा वर्षाचे आपले वैर बासनात गुंडाळून भाजपला रोखण्यासाठी…

Read More

दीपक मोहिते, ” अटीतटीचा सामना,” वसई विरार मनपा निवडणूक ; क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारे निकाल… वसई विरार शहरातील नागरिकांना आजवर निवडणुकीत चुरस काय असते,हे कधी बघायला मिळाले नव्हते. कारण,आजवर झालेल्या तमाम निवडणुका बहुजन विकास आघाडीने एकहाती जिंकल्या होत्या.काल प्रथमच त्यांना मिनिटा मिनिटाला उत्कंठा वाढवणाऱ्या निकालाचा अनुभव घ्यावा लागला.या निवडणुकीत भाजपने बहुजन विकास आघाडीसमोर प्रचंड आव्हान उभे केले होते.या निवडणुकीत भाजपला ८१ जागा मिळतील,अशी त्यांच्या स्थानिक नेत्यांना अपेक्षा होती.पण त्यांचा घोडा ४४ जागांवर अडखळला.शेवटच्या टप्यात बहुजन विकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली व ७१ जागांचा पल्ला गाठला.हा विजय केवळ आणि माजी आ.हितेंद्र ठाकूर यांची लढाऊ वृत्ती व प्रचंड मेहनत, अशा दोन कारणामुळे शक्य…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आज माझे काय होणार ? काल अखेर संध्याकाळी निवडणुकीची रणधुमाळी थांबली.मतदान संपल्यानंतर आज सकाळी दहाच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात होणार आहे.त्यामुळे सुमारे साडेपाचशे उमेदवारांचा जीव तब्बल १७ तास टांगणीला लागला आहे.आपलं काय होणार ? या एकमेव चिंतेने त्यांना घेरलं आहे. काल सकाळच्या सुमारास रेंगाळलेल्या मतदानाने दुपारी दोननंतर चांगला वेग घेतला व संध्याकाळी मतदान संपले तेंव्हा ते ५७.१२ % झाले होते.मतदान करण्यासंदर्भात सर्वसाधारण मतदारामध्ये असलेली उदासीनता व आपण मतदान केले काय आणि न केल्याने काय फरक पडतो.अशा मानसिकतेमुळे ही संपूर्ण प्रक्रिया आता अधोगतीच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.या निवडणुकीत भाजपने कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही.लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता…

Read More

दीपक मोहिते, ” लोकशाहीचा दिखाऊ सोहोळा,” कितीही डोळसपणे मतदान करा, पण तुमची किंमत शून्य… आज महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे.सुमारे बारा लाख मतदार ११५ जागांसाठी मतदान करणार आहेत.मतदारांना देखील ठाऊक आहे,की केवळ आज आपल्याला किंमत आहे.उद्यापासून आपल्याला कुत्रंही विचारणार नाही.पण व्यवस्थेने ” मतदान हा अधिकार आहे,आणि ते आपण पार पाडलेच पाहिजे,” आपल्या मनात इतकं खोलवर रुजवले आहे की आपण हे कर्तव्य पार पाडण्यासाठी सकाळीच घराबाहेर पडतो,व हे आद्य कर्तव्य पार पाडतो. असो,पण तमाम मतदार आज सकाळीच या ऐतिहासिक सोहोळ्यात सामील होण्यासाठी घराबाहेर पडले आहेत.ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.वास्तविक या निवडणुकीच्या प्रचारात विकासाचा मुद्दा गाजेल, अशी अपेक्षा होती. पण आरोप…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” याला म्हणतात, ” परफेक्ट टायमिंग, ” दोन दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीचे क्रमांक २ चे नेते व माजी महापौर राजीव पाटील यांनी आपल्या काही समर्थक उमेदवारांच्या भेटीगाठी घेतल्या.त्यांच्या या भेटीनंतर सर्वत्र वादळ उठले.नालासोपारा शहरातील त्यांचे व्यवसायिक भागीदार निलेश चौधरी यांची त्यांनी आवर्जून भेट घेतली.या भेटीत त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार ” धनंजय गावडेला पाडा,” असे आवाहन केले.धनंजय गावडे हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.एकेकाळी माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे गावडे सध्या ठाकुरांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.राजू पाटील यांचे सहकारी निलेश चौधरी व माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचे सध्याचे मित्र धनंजय…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, असंख्य गुन्हे असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,तब्बल १५६ उमेदवार कोट्याधीश, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक जागांवर दिग्गज उमेदवारांच्या लढती होत आहेत.हे सर्व उमेदवार पूर्ण ताकदीनिशी रणांगणात उतरले आहेत.पण मतदार मात्र मनात काय चालले आहे,याचा थांगपत्ता काही लागू देत नाहीत.दरम्यान या दिग्गज उमेदवारांमध्ये हल्ले – प्रतिहल्याचा सिलसिला आता जोरात सुरू झाला आहे.या निवडणुकीत मतदार कोणाच्या पारड्यात आपली मते टाकतात,हे १६ जाने.रोजी होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.प्रचार संपायला आता केवळ ७२ तास उरले आहेत.या तीन दिवसात उमेदवाराना वेगवान असा प्रचार करावा लागणार आहे.मतदानाच्या एक दिवस अगोदरच्या रात्री ” रात्रीचा खेळ चाले,” या नाट्याचा प्रयोग होण्याची शक्यता गृहीत धरून…

Read More