Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, भाजपवाल्याना राष्ट्रहितापेक्षा पक्षीय हित मोठे, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या मिडियाने दोन देशात आता युद्धाला तोंड फुटणार,मोदी प्रत्येक दहशतवाद्याला हुडकून ठोकणार,पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे,अशा बातम्या पेरल्या.पण त्याचवेळी पाकिस्तानची आर्मी आपल्या टेहळणी चौक्यावर बेछूट गोळीबार करत होती. आपणही सारे लवकरच युद्ध सुरु होईल,अशी अपेक्षा बाळगून होतो.या घटनेला अकरा दिवस उलटल्यानंतरही आपल्या तपास यंत्रणाना अद्याप त्या पाच नराधमांचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही.हे आपल्या तपास यंत्रणा तसेच लष्कराचे अपयशच म्हणावे लागेल.पूर्वी दोन देशात युद्ध सुरू करणे,सहजशक्य होत असे.आता तशी स्थिती नाही.कारण काही किरकोळ अपवाद वगळता प्रत्येक देश आता अन्वस्त्रधारी देश बनला आहे.त्यामुळे युद्ध होणे,आजच्या घडीला कोणालाही परवडणारे नाही.पाकिस्तानला बेचिराख करण्याची…

Read More

दीपक मोहिते, मिडिया/सोशल मीडिया, ” शाप की वरदान ?, ” चार महिन्यापूर्वी निवडणुकीची धामधूम आता थांबली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील,हे सांगणे आता ब्रम्हदेवालाही शक्य नाही.चार महिन्यापूर्वी सोशल मिडियावर धडाडणाऱ्या तोफा आता पुढील निवडणुकापर्यंत आग ओकणार नाहीत.एकमेकांच्या उखाळ्या- पाखाळ्या ऐकण्यात महिना कधी निघून गेला,ते कळलेही नाही. या निवडणुकीत सोशल मीडियावरील करामतीमुळे तर मतदारांचे चांगलेच मनोरंजन झाले.निवडणूक प्रक्रियेत सोशल मीडिया,हे आता सर्वात प्रभावी माध्यम ठरले आहे आणि लोकानी ते स्विकारलेही आहे.पूर्वी पक्षांची मुख्यालये,ही निवडणुक प्रक्रियेतील महत्वाची केंद्रे म्हणून ओळखण्यात येत असत,आता त्याची जागा सोशल मीडियाच्या वॉररुमने घेतली आहे.या वॉररूम्स आता अत्यंत प्रभावी ठरू लागल्या आहेत. ” होत्याचे नव्हते व नव्हत्याचे…

Read More

सुरेश वैद्य,पालघर, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उदघाटन, राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मदत मिळावी,याकरिता जिल्हास्तरावर ” मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष,” स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.त्यानुसार महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात या कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खा.डॉ.हेमंत सवरा जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते.या निधीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २२…

Read More

संजय लांडगे,वाडा वाडा एसटी आगारात पाणपोईची सोय, वाडा बस आगाऱात असलेली पाणपोई नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली होती.याविषयी माध्यमामध्ये वृत्त झळकल्यानंतर त्याची दखल चार्मोद्याग कामगार सेनेचे ठाणे,पालघर जिल्हाध्यक्ष भरत गायकवाड यांनी घेतली.जगदंबा कंपनीचे मालक मालपाणी यांच्याकडून वॉटर कूलर आरो सिस्टम उपलब्ध करून दिला. या पाणपोईमुळे नागरिक व प्रवाश्यांना २४ तास थंड व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार आहे. आज कामगार दिनाचे औचित्या साधून पाणपोईचे लोकार्पण जगदंबा कंपनीचे व्यवस्थापक सुशील तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.या यावेळी वाडा आगाराचे कर्मचारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

Read More

मनिष धानू,डहाणू महाराष्ट्र दिनी ५ लाख सीड बोल्स निर्मितीचा संकल्प, महाराष्ट्र दिनानिमित्त ” पर्यावरण वाचवा,” वसुंधरा सजवा,” या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात नवीन प्रयोगाला सुरूवात झाली आहे.या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते,खासदार डॉ.हेमंत सवरा,जिल्हाधिकारी डॉ इंदूराणी जाखर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,तसेच इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.विजेत्यांना प्रशस्तीपत्रासह ” सीड बॉलचा डबा,” देऊन गौरवण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर,संगीता भागवत तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये चर्चेत येणारे नाव म्हणजे ” सीडबॉल मॅन,” दीपक देसले यांचे.जिल्हा परिषद शाळा लिलकपाडा, कोसबाड ( ता. डहाणू )…

Read More

संजय लांडगे,वाडा वाड्यात अक्षय तृतीया निमित्त आयोजित शिवजयंती उत्साहात साजरी, शिवसेना ( उबाठा ) वाडा शाखेतर्फे अशोकगड येथे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर शिवपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नेत्या ज्योती ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवचरित्राचा माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहचवणे, त्यांचे विचार,त्यांचा इतिहास प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवणे ही काळाची गरज असल्याचे मत ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केले. स्व.धर्मवीर आनंद दिघे यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी शिवजयंती साजरी करण्याची परंपरा चालू केली.वाडा शहर शाखेतर्फे दरवर्षी ती उत्साहात साजरी केली जाते. ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष…

Read More

संजय लांडगे,वाडा कामगाराच्या हस्ते झेंडावंदन संपन्न, आबिटघर ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी संतोष साठे या आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या सन्मानासाठी पुढाकार घेऊन विविध संकल्पना राबवत असतात. आज १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयातील झेंडावंदन करण्याचे दायित्व त्यांनी गावातील जेष्ठ कामगार तथा गावातील प्रतिष्टीत व्यक्तिमत्व ह.भ.प. सतीश दूंदाराम पाटील ( भाऊ ) यांच्याकडे सोपवले.ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सरपंच साक्षी साठे तसेच उपसरपंच सुप्रिया पाटील व ग्रामपंचायत अधिकारी संजय पाटील यांनी प्रथम त्यांचे स्वागत करून सत्कार केला व त्यानंतर त्यांच्या शुभहस्ते झेंडा फडकवण्यात आला. सोबत माध्यमिक विद्यामंदिर अबिटघर येथे सरपंच साक्षी साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी माध्यमिक विद्यालय…

Read More

नवीन पाटील,सफाळे विनयभंग करणा-या आरोपीस एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा, पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलिस ठाणे हद्दीतील केळवा रोड धोंदलपाडा भागात एका महिलेची छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या ओमकार संतोष जाधव रा. पिलाजीनगर,केळवा रोड पूर्व याला पालघर न्यायालयाने एक वर्षाची कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,३० मार्च २०२५ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास पिडीत फिर्यादी या धोंदलपाडा,केळवे रोड पूर्व येथे टिकलीला स्टोन लावण्याचा कच्चा माल घेवून जात असतांना आरोपी ओमकार संतोष जाधव या तरुणाने पिडीत महिलेच्या मानेला पकडले.त्यावेळी त्या महिलेने त्यास जोरात झटका देवून स्वतः ला सोडवून घेवून पळण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पिडीत महिलेची साडी…

Read More

संजय ठाकूर,चहाडे कुणबी सेनेने केलेल्या मागणीला यश – अविनाश पाटील, गेल्या पंचवीस वर्षापासून म कुणबी सेनेने संघटनेच्या स्थापनेपासून जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती.ती मागणी आता मार्गी लागल्यामुळे कुणबी समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या २५ वर्षात संघटनेने कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन ठिकाणी आरक्षण परिषदा घेतल्या होत्या. या तिन्ही ठिकाणी झालेल्या परिषदांमध्ये जातनिहाय जनगणना करावी,ही प्रमुख मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारने याबाबत आता निर्णय घेतला असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जातनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. भारतात जनगणनेला सुरुवात ब्रिटिशांच्या काळात झाली होती १८७२ मध्ये पहिल्यांदा जनगणना केली गेली १९३१ पर्यंत करण्यात आलेल्या…

Read More

नदीम शेख,पालघर शरीर स्वास्थासाठी प्रत्येकाने खेळायला हवे – जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड, आपलं शरीर सुदृढ राहावे, यासाठी प्रत्येकाने खेळामध्ये रुची दाखवली पाहिजे.खेळामुळे व्यक्तिमत्व खुलते,बुद्धिमत्ता तरल होते.मानसिक स्वास्थही सुदृढ राहते.त्यासाठी प्रत्येकाने खेळायला हवे.असा मौलिक सल्ला जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरातील शिबिरार्थींना दिला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघरतर्फे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पालघर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील मैदानावर करण्यात आले असून या शिबिराच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू गिरीश इरनाक,आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर अभिजीत गुरव व जयवंती देशमुख आदी उपस्थित होते. प्रत्येक मुलाने दरवर्षी एक नवीन खेळ खेळायला शिकले पाहिजे.खेळल्यामुळे…

Read More