संजय लांडगे,वाडा
वाडा एसटी आगारात पाणपोईची सोय,
वाडा बस आगाऱात असलेली पाणपोई नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली होती.याविषयी माध्यमामध्ये वृत्त झळकल्यानंतर त्याची दखल चार्मोद्याग कामगार सेनेचे ठाणे,पालघर जिल्हाध्यक्ष भरत गायकवाड यांनी घेतली.जगदंबा कंपनीचे मालक मालपाणी यांच्याकडून वॉटर कूलर आरो सिस्टम उपलब्ध करून दिला.
या पाणपोईमुळे नागरिक व प्रवाश्यांना २४ तास थंड व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार आहे.
आज कामगार दिनाचे औचित्या साधून पाणपोईचे लोकार्पण जगदंबा कंपनीचे व्यवस्थापक सुशील तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.या यावेळी वाडा आगाराचे कर्मचारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

