संजय लांडगे,वाडा
कामगाराच्या हस्ते झेंडावंदन संपन्न,
आबिटघर ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी संतोष साठे या आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या सन्मानासाठी पुढाकार घेऊन विविध संकल्पना राबवत असतात.
आज १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयातील झेंडावंदन करण्याचे दायित्व त्यांनी गावातील जेष्ठ कामगार तथा गावातील प्रतिष्टीत व्यक्तिमत्व ह.भ.प. सतीश दूंदाराम पाटील ( भाऊ ) यांच्याकडे सोपवले.ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सरपंच साक्षी साठे तसेच उपसरपंच सुप्रिया पाटील व ग्रामपंचायत अधिकारी संजय पाटील यांनी प्रथम त्यांचे स्वागत करून सत्कार केला व त्यानंतर त्यांच्या शुभहस्ते झेंडा फडकवण्यात आला.
सोबत माध्यमिक विद्यामंदिर अबिटघर येथे सरपंच साक्षी साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी माध्यमिक विद्यालय आबिटघरचे मुख्याध्यापक दिलीप पाटील,ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव,कुलदीप पाटील, धनश्री पाटील,कल्याणी साठे, भावना रायात,निखिल पाटील, स्मिता चिमडा,मनीषा मुकने, कल्पेश आमले,ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक,विध्यार्थी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

