- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
संजय नेवे,विक्रमगड, सावरोली पाणीपुरवठ्याची पाण्याची टाकीचा काही भाग तोडण्यात येणार, विक्रमगड तालुक्यातील सावरोली गावातील काही पाड्यांसाठी ही योजना मंजूर झाली आहॆ.या योजनेची जलवाहिनी,विहीर अन्य कामे मार्गी लागली असून पाणी साठवणटाकीचे बांधकाम सुरू झाले आहॆ.या टाकीचे कॉलम व्यवस्थित नसल्यामुळे या टाकीचे काही कॉलम तोडण्याचा आदेश विक्रमगड येथील पाणीपुरवठा विभागाने ठेकेदाराला दिले आहेत.ही कामे अशाच पद्धतीने चालू राहिली तर भविष्यात या जलजीवन मिशन योजनेचा पार बोजवारा उडालाशिवाय राहणार नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात जलजीवन मिशन अंतर्गत ” हर घर नल, ” योजना,लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.विक्रमगड तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे व्यवस्थित व सुरळीतपणे सुरू करावीत,अशी…
दीपक मोहिते, संतोष देशमुखांच्या लेकरांना न्याय मिळवून देणे,सरकारची नैतिक जबाबदारी, संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपी एकामागोमाग पोलिसांना सापडू लागले आहेत.त्यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.हे सर्व आरोपी पुण्यात सापडल्यामुळे त्यांना आश्रय कोणी दिला ? आणि प्रदीर्घ काळ ते पोलिसांना का सापडू शकले नाहीत.या दोन प्रश्नांची उत्तरे सरकारच्या गृहविभागाने द्यायला हवीत.कारण हे सर्व आरोपी एकाच शहरात सापडतात,याचा अर्थ काय व कसा लावायचा ? वास्तविक बीड जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा,जिल्ह्यात गेली अनेक वर्षे पाण्याचा कायम दुष्काळ असतानाही बीडच्या शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून शेती/बागायती फुलवली.त्या जमिनीत गुन्हेगारीची पाळंमुळं कधी रुजली,हे खुद्द बिडवासीयांना कळले देखील नाही.संतोष देशमुख,हा कोणत्या जातीचा होता,यापेक्षा संकटात असलेल्या आपल्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आता हितेंद्र ठाकुराना लवकरात लवकर भाकरी फिरवावी लागणार आहे… कालच्या राज – का – रण ? या शीर्षकाखाली आपण राजकारणाच्या सद्यःस्थितीवर प्रकाश टाकला होता.आज आपण ” अस का घडलं ? व त्यामागची नेमकी कारणे आहेत ? ” या दोन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.कालच्या माझ्या लेखाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.अनेकांना लेख आवडला,त्यामुळे आज दुसरा भाग लिहिण्याचे धाडस मी करत आहे. वसई तालुका हा एकेकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता.अनेक वर्षे वर्तक घराण्याचे या तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व राहीले.ते वर्चस्व १९८० पर्यंत अबाधित राहिले.त्यानंतर समाजवाद्यांनी तो भेदला,पण तो त्यांच्या हातून निसटला व वसईच्या क्षितिजावर एक उदयोन्मुख…
वसंत भोईर,वाडा, वाडा तालुक्यात बहरली ताग पिकाची शेती, रब्बी हंगामात अधिकाधिक उत्पादनासाठी वाडा तालुक्यातील शेतकरी विविध रब्बी पिकांचे उत्पादन घेण्याचे प्रयोग करीत आहेत.यावर्षी तालुक्यातील गो-हे विभागातील पन्नास हुन अधिक शेतकऱ्यांनी ताग पिकाची पेरणी केली आहे. सध्या ही तागाची शेती चांगलीच बहरली आहे. वाडा तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामात कलिंगड,टरबुज,फुलशेती या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करुन चांगले उत्पादन घेत आहेत.मात्र ही पिके अधिक खर्चिक असल्याने कमी खर्चात व कुठल्याही प्रकारच्या खतांची तसेच पाण्याची आवश्यकता नसलेल्या हरभरा,वाल मुग, तिळ, तुर ही नगदी पिके घेत आहेत.येथील शेतकऱ्यांनी अत्यंत कमी खर्च व अधिक उत्पादन देणारे ताग,या पिकाची त्यामध्ये भर घातली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार,विक्रमगड…
नदीम शेख,पालघर, मोखाडा येथे तालुकास्तरीय शेतकरी मेळावा व प्रशिक्षण शिबिर संपन्न, प्रशिक्षण शिबिर म्हणजे तुम्हा शेतकऱ्यांना दिलेली माहिती, आपणास अनुभवानी ज्ञात आहेच पण त्या माहितीचा उपयोग आपल्या आपण प्रत्यक्ष शेती करताना अडचणी, त्रुटी अथवा पशु पालन यासाठी करावयाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले.तसेच शेतकरी व पशुपालकांशी स्थानिक बोली भाषेतून संवाद साधत मार्गदर्शन केले. मोखाडा, जव्हार येथील शेती पिके उदा.तुर,नाचणी,वरी, सडीचे तांदूळ इ. बाजारात ब्रँड म्हणून विकले जातात,असे सांगून येथील स्थानिक शेतमाल व भाजीपाला कसा सेंद्रिययुक्त आणि दर्जेदार आहे व तो शेतकऱ्यांनी कसा विकला पाहिजे,याबाबत मार्गदर्शन केले. आज मोखाडा तालुक्यातील तालुकास्तरीय कृषी व पशुसंवर्धन विभाग जिल्हा…
सुरेश काटे,तलासरी, सावित्रीच्या लेकींनी आत्मनिर्भर होऊन समाज परिवर्तन घडवावे- प्राचार्य डॉ. राजपूत, आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी येथे सांस्कृतिक विभाग आणि महिला विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांच्या मार्गदर्शनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास नीता विवेकानंद देसले,केंद्रप्रमुख आमगाव,या वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.तसेच प्रा.डॉ.बी.ए. राजपूत,महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.अर्जुन होन, उपप्राचार्य डॉ.आर.एन.पवार तसेच सांस्कृतिक विभाग आणि महिला विकास विभागाचे सर्व सदस्य उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांनी प्रस्ताविकात त्यांच्या कवितेद्वारे सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा अत्यंत प्रभावीपणे मांडला. सावित्रीबाईंच्या पुरोगामी विचारांचे महत्त्व व तळागाळातील शिक्षणाची…
वसंत भोईर,वाडा, स्थानिक पेंढा व्यापारी संगनमताने करतात शेतकऱ्यांची लूट, वाडा तालुक्यात विभागवार पेंढा खरेदी केंद्राची गरज, तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा पावसाच्या भितीने भात कापणीसोबत घाईघाईने झोडणीलाही सुरुवात केली आहे.झोडणी करून शेतात ठेवलेल्या पेंढ्याला चांगला भाव मिळेल,या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेंढा व्यवस्थित रचून ठेवला आहे.मात्र पेंढा खरेदी करणारे स्थानिक व्यापारी लबाडीने भाव कमी करण्यासाठी शकल लढवत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना कमी किमतीत आपला पेंढा विकावा लागत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यातील स्थानिक पेंढा खरेदी करणारे छोटे-मोठे व्यापारी संगनमत करून हेतुपूर्वक काही दिवस पेंढा खरेदीकडे पाठ फिरवत आहेत.तसेच मुंबई व वसई शेजारील पट्ट्यात म्हशींच्या तबेल्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत.तेथे पेंढ्याला मोठ्या प्रमाणात मागणी…
दीपक मोहिते, राज का रण ? उंदराची पळापळ सुरू सुरू झाली आहे ; पक्षनिष्ठा गेली तेल लावत… सत्तांतर झाले की पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सैरभैर होत असतात,त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी देखील ” आपलं काय होणार ?” या भितीमुळे पळ काढत असतात.वसई तालुक्यात सध्या असेच चित्र पाहायला मिळत आहे.महानगरपालिकेचे अनेक वरीष्ठ अधिकारी आपली बदली करून घेण्यासाठी विरार ते मंत्रालय,अशा चपला झिजवत आहेत.तर अनेक कार्यकर्ते व माजी नगरसेवक हवेच्या दिशेने आपली पाठ फिरवण्याच्या तयारीत आहेत.यालाच आपण ” घर फिरलं,की वासेही फिरतात,” अस म्हणतो. राजकारणात कोण कोणाचा नसतो,या उक्तीप्रमाणे पराभूत पक्षाचे कार्यकर्ते व नगरसेवक देखील त्याला अपवाद नाहीत,हे लवकरच वसई-विरारकर नागरिकांना अनुभवायला मिळणार…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” हे असंच चालायचं ” ही मानसिकता,आता बदलायला हवी, राज्यात कुपोषण व अन्य आजाराने मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही.अशा स्थितीत गरोदर महिलांच्या मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडू लागल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व वैद्यकीय व्यवस्था व्हेन्टीलेटरवर गेल्याचे दिसून आले आहे.या आठवड्यात विक्रमगड व जव्हार,या दोन तालुक्यात दोन गरोदर महिलांचे वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे झालेले मृत्यू पालघरवासियांचे मन सुन्न करून गेले.या दोन्ही घटनांची चौकशी करण्यात येणार आहे.पण या चौकशीतून फारसे काही निष्पन्न होणार नाही.कारण ग्रामीण भागातील व्यवस्था पार गंजली आहे.ज्या अधिकाऱ्यांवर व्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यांची मने मेली आहेत, त्यामुळे जनतेला त्यांच्याकडून फारशा अपेक्षा…
जव्हार प्रतिनिधी, मातेसह बाळाचाही मृत्यू , अचानक मृत्यू कसा झाला कुटुंबीयांची चौकशीची मागणी. मोखाडा तालुक्याची गरोदर महिलेच्या मृत्यूची घटना ताजी असतांना जव्हार येथे एका महिलेची प्रसूती होत असताना अचानक तिचा व बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात काल रात्री घडली आहे.ती महिला सुरवातीला चांगली होती, स्वतःहून प्रसुती करिता गेली असताना तिचा अचानक मृत्यू कसा झाला, याबाबत सखोल चौकशी करावी,अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. विक्रमगड तालुक्यातील गालतरे येथील कूंता वैभव पडवळे वय ३१ वर्ष,या महिलेला प्रसूतीकरिता जव्हार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा नियमित विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होता.मात्र येथे योग्य त्या वैद्यकीय सुविधा नसल्याने,तुम्ही तिला…
