सुरेश काटे,तलासरी,
सावित्रीच्या लेकींनी आत्मनिर्भर होऊन समाज परिवर्तन घडवावे-
प्राचार्य डॉ. राजपूत,
आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी येथे सांस्कृतिक विभाग आणि महिला विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांच्या मार्गदर्शनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास नीता विवेकानंद देसले,केंद्रप्रमुख आमगाव,या वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.तसेच प्रा.डॉ.बी.ए. राजपूत,महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.अर्जुन होन, उपप्राचार्य डॉ.आर.एन.पवार तसेच सांस्कृतिक विभाग आणि महिला विकास विभागाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांनी प्रस्ताविकात त्यांच्या कवितेद्वारे सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा अत्यंत प्रभावीपणे मांडला. सावित्रीबाईंच्या पुरोगामी विचारांचे महत्त्व व तळागाळातील शिक्षणाची खंत ही व्यक्त केली.शिक्षणातील आत्मनिर्भरतेचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.विद्यार्थ्यांकडून शिक्षणाप्रती जागरूक राहण्याचा व समाज परिवर्तन करण्याचा संकल्प प्राचार्यांनी करून घेतला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी नीता देसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर केलेल्या आपल्या भाषणात त्यांनी शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी घेतलेले कष्ट धडपड व मुलींसाठी केलेले कार्य,बालविधवा,केशवपण यांसारख्या अनिष्ट प्रथांवर बंदी घालण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.यांसारख्या विविध बाबींचा त्यांनी आढावा घेतला.आजच्या शिक्षणातील उणीवा व त्यात काही सुधारणाही सुचवल्या.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या कला आणि वाणिज्य विभागाचे २२० हून अधिक विद्यार्थी व महाविद्यालयाचे सर्व सहाय्यक प्राध्यापक उपस्थित होते.

