संजय नेवे,विक्रमगड,
सावरोली पाणीपुरवठ्याची पाण्याची टाकीचा काही भाग तोडण्यात येणार,
विक्रमगड तालुक्यातील सावरोली गावातील काही पाड्यांसाठी ही योजना मंजूर झाली आहॆ.या योजनेची जलवाहिनी,विहीर अन्य कामे मार्गी लागली असून पाणी साठवणटाकीचे बांधकाम सुरू झाले आहॆ.या टाकीचे कॉलम व्यवस्थित नसल्यामुळे या टाकीचे काही कॉलम तोडण्याचा आदेश विक्रमगड येथील पाणीपुरवठा विभागाने ठेकेदाराला दिले आहेत.ही कामे अशाच पद्धतीने चालू राहिली तर भविष्यात या जलजीवन मिशन योजनेचा पार बोजवारा उडालाशिवाय राहणार नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात जलजीवन मिशन अंतर्गत ” हर घर नल, ” योजना,लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.विक्रमगड तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे व्यवस्थित व सुरळीतपणे सुरू करावीत,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहॆ.

