नदीम शेख,पालघर,
मोखाडा येथे तालुकास्तरीय शेतकरी मेळावा व प्रशिक्षण शिबिर संपन्न,
प्रशिक्षण शिबिर म्हणजे तुम्हा शेतकऱ्यांना दिलेली माहिती, आपणास अनुभवानी ज्ञात आहेच पण त्या माहितीचा उपयोग आपल्या आपण प्रत्यक्ष शेती करताना अडचणी, त्रुटी अथवा पशु पालन यासाठी करावयाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले.तसेच शेतकरी व पशुपालकांशी स्थानिक बोली भाषेतून संवाद साधत मार्गदर्शन केले.
मोखाडा, जव्हार येथील शेती पिके उदा.तुर,नाचणी,वरी, सडीचे तांदूळ इ. बाजारात ब्रँड म्हणून विकले जातात,असे सांगून येथील स्थानिक शेतमाल व भाजीपाला कसा सेंद्रिययुक्त आणि दर्जेदार आहे व तो शेतकऱ्यांनी कसा विकला पाहिजे,याबाबत मार्गदर्शन केले.
आज मोखाडा तालुक्यातील तालुकास्तरीय कृषी व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती मोखाडा,यांच्या संयुक्त विद्यमाने ” भव्य शेतकरी मेळावा व पशुपालक प्रशिक्षण शिबिर,” मौजे भेंडीचापाडा ( सातूर्ली ) तालुका मोखाडा येथे आयोजित करण्यात आले होता.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती,सभापती संदिप पावडे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये तसेच युवराज गिरंधले सभापती,पंचायत समिती मोखाडा,यांच्या अध्यक्षतेखाली प्रदीप वाघ, उपसभापती,पंचायत समिती मोखाडा,जिल्हा परिषद सदस्य कुसुम झोले,सदस्य हबीब शेख,पंचायत समिती सदस्य अनिता पाटील,लक्ष्मी भुसारे, आशा झुगरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती संदिप पावडे यांनी सेंद्रिय शेती व पशुपालन या शेतकऱ्यांसाठी कशा एकमेकास पूरक आहेत, याबाबत सांगून पशुपालन व शेती करणारा शेतकरी हा ” जगाचा पोशिंदा,” आहे.त्याने शेतीपूरक व्यवसाय केले पाहिजेत,यासाठी सरकारचा शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष लाभ देण्याचा मानस असून हा मानस पूर्ण करण्याचा मी वसा घेतला आहे.आपला तरुण वर्ग हा शेतीकडे आकर्षित झाला पाहिजे,त्यांनी अत्याधुनिक शेती केली पाहिजे. शेतकऱ्यांपर्यंत घरोघरी योजना कशा पोहोचतील,यासाठी आम्ही भिंतीवरचे कॅलेंडरद्वारे प्रसार करत आहोत.सन २०२३-२४ व सन २०२४-२५ या दोन्ही आर्थिक वर्षांमध्ये कृषि व पशुसंवर्धन समिती मार्फत अर्थसंकल्पात कशाप्रकारे योजनांची वाढ केली,जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व पशुपालक लाभार्थ्यांना लाभ मिळेल, याबविषयी माहिती देऊन योजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज गिरंधले सभापती,आणि उपसभापती प्रदीप वाघ यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षित होऊन शेती व पशुपालन,यासाठी या ज्ञानाचा उपयोग करा,असे आवाहन केले.प्रशिक्षणास उपस्थित अनुभवी शेतकरी गंगाराम वांगड व सुरेश वांगड यांनी फळबाग लागवड,मोगरा लागवड,भाजीपाला लागवड नर्सरी,याबाबत अनुभव कथन केले तर वाळू लचके,खोच, यांनी दुग्धजन्य पदार्थ निर्मिती याबाबत आपले अनुभव कथन केले.तर दिलीप बोढेरे, पळसुंडे,यांनी फळबाग लागवड तर गणेश वांगड सातुर्ली यांनी सेंद्रिय शेती व भाजीपाला लागवड याबाबत शेतकरी व पशुपालक यांना माहिती दिली.यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते शेतकरी लाभार्थ्यांना पॉवर ट्रेलर,पॉवर विडर,भात कापणी यंत्र आदि अत्याधुनिक यांत्रिकी शेतीसाठी यंत्रांचे वाटप करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या दोन दिवसीय प्रशिक्षणास मेळाव्यासाठी उपस्थित डॉ. प्रशांत कांबळे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त,मुंबई, यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.डॉ.प्रकाश हसनाळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद पालघर,कृषि विभागाचे मोहीम अधिकारी विश्वजीत माने यांनी मार्गदर्शन केले.तसेच बँक ऑफ बडोदा चे मुख्यालयाचे मॅनेजर व इतर बँकांचे अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी सातुर्ली सरपंच प्रमिला वांगड, उपसरपंच तुळशीराम वाघ, उपस्थित होते.पंचायत समिती मोखाडाचे गटविकास अधिकारी मधुकर गवळी,डॉ. संजय काकलिज व कृषि अधिकारी आर.के.गोडे व पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

