- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा वाडा – बेरशेतीत मिरची पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, तालुक्यातील बेरशेती या गावातील अनेक शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली होती. मात्र हवामान बदलामुळे मिरची पिकावर करपा या रोगाचा प्रादुर्भाव झाला व हाती आलेले पिक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून राज्यभरात ओळख आहे.वाड्याचा तांदूळ ” वाडा कोलम,” या नावाने प्रसिद्ध आहे,असे असले तरी भातशेती हा व्यवसाय पुर्णत: निसर्गावर अवलंबुन आहे. तसेच मजूरांचा तुटवडा,खते,बी-बियाणे, औषधे यांची भरमसाठ दरवाढ,आदी कारणामुळे भातशेतीचा व्यवसाय आता शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे येथील बहुतांशी शेतकरी हे भात पीक घेतल्यानंतर आपल्या शेतीत असलेल्या पाण्यावर विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करत असतात.यातून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पोलिसांनी प्रेक्षकांना नोटीसा देणे,ही कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, कुणाल कामरा याला जेरबंद करण्यासाठी राज्य सरकार जंग जंग पछाडत आहे.पण कुणाल कामराही दररोज नवनवीन व्हिडीओ व ट्विट करून सरकारला डीवचत आहे.कुणाल कामरावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू झाले आहे.मात्र कुणाल कामरा मात्र राज्य सरकार व पोलिसांची खिल्ली उडवण्यात गर्क आहे.तो दररोज नवीन व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करत सुटला आहे. कुणाल कामराच्या त्या गाण्याला देश व परदेशातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.कुणाल कामरा यांच्या बँक खात्यामध्ये परदेशातून दररोज हजारो डॉलर्स जमा करण्यात येत आहेत.आतापर्यंत त्याच्या खात्यात पाच कोटी रु.जमा झाले आहेत.कुणाल हा हजर होत नसल्यामुळे…
वसंत भोईर,वाडा वाड्यात आजपासून ” जिवंत सातबारा,” मोहीम राबवण्यास सुरवात, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या ७/१२ उताऱ्यावरील मयत खातेदारांची नावे कमी करून त्यावर त्यांच्या वारसांची नावे लागण्यासाठी आजपासून वाडा तालुक्यात जिवंत सातबारा,ही मोहीम राबवण्यात येत आहे.घोणसई येथे आज सकाळी चावडी वाचन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने शासन घेतलेल्या निर्णयानुसार ही मोहीम राज्यभर राबवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने वाडा तालुक्यातील सर्व गावात आजपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. वारस नोंदणी प्रक्रियेत बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो.काहीवेळा कोर्ट केसेस सुद्धा होतात आणि शेतकऱ्यांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागतो.या मोहिमेच्या निमित्ताने हा प्रकार थांबणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिवंत सातबारा…
वसंत भोईर,वाडा वाडा तालुका विकासा पासून कोसो मैल दूर, वाडा तालुका ग्रामीण व अतिदुर्गम भाग असलेला तालुका असून,विकासाच्या बाबतीत गेली अनेक वर्षे राजकारण्यांकडून दुर्लक्षित राहिला आहे.शासकीय योजना राबवल्या जातात,पण त्या योजनेतील त्रुटीमुळे त्यांचा लाभ खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मिळत नाही. आजवर ग्रामीण भागातील स्थानिक भूमिपुत्रानी अनेक आंदोलने केली.अर्ज विनंती झाल्या,मात्र वीज,पाणी, सिंचन प्रकल्प,बेरोजगारी या ज्वलंत समस्या सुटलेल्या नाहीत.तालुक्याचा विकास होणार तरी कधी ? असा सवाल नागरिक विचारत आहेत. वाड्यात १९९२ पासून औद्योगिक उद्योगधंदे व कारखानदारी सुरू झाली.मात्र कारखान्यासाठी आवश्यक असलेली वीज स्वस्त व अधिक विद्युतभाराची मिळत नसल्याने येथील अनेक कारखाने अल्पावाधीत परराज्यात गेले.त्यामुळे ग्रामीण भागातील उद्योग बंद पडले.बेकारी वाढली,आर्थिक व्यवहारात मंदी…
वसंत भोईर,वाडा ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकांवर संकट तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपाला, काकडी,मिरची,भेंडी,दुधी, भोपळा,घोसाळी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी संकटात सापडले आहेत. वाडा तालुक्याचे तापमान सध्या ३९ ते ४० अंशापर्यंत पोहोचले आहे.त्यामुळे पिकांच्या वेलीला लागणारी फळे करपत असून त्यांचा आकार लहान होत आहे. अशातच घोसाळी,मिरची पिकांवर करपा रोग पडल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्यातील जाळे,वारनोळ,गातेस, पिंपळास,गुंज,देवघर, बुधावली परिसरातील शेतकरी उन्हाळी भाजीपाल्याचे मोठे उत्पन्न घेतात भिवंडी, कल्याण,ठाणे,वसई,विरार येथून मागणी होत असते.परंतु गेले चार-पाच दिवस वातावरणात उष्मा वाढल्याने भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याची माहिती शेतकरी प्रदीप गोरे यांनी दिली.
संजय लांडगे,वाडा जीवशास्त्र विषयात वाड्याचे प्रसाद इसामे यांना सुवर्णपदक, वाड्याचे प्रसाद इसामे यांनी मुंबई येथील डॉ.होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमधून जीवनशास्त्र ( प्राणीशास्र ) या विषयात पदव्युत्तर शिक्षणात सुवर्ण पदक पटकावत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या यशाची दखल घेत अभ्यास अकॅडमीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे येथील रहिवासी असलेले प्रसाद इसामे,हे सध्या वाडा येथे राहत आहेत.खाजगी क्लासेसमध्ये शिकवून त्यांनी आपले पुढील उच्च शिक्षण चालू ठेवले होते.पुढे त्यांनी डॉ.होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पदव्युत्तर शिक्षणात जीवनशास्त्र ( प्राणीशास्र ) या विषयात १० पैकी १० गुण मिळवत सुवर्ण पदक मिळवले.या युनिव्हर्सिटीमधून ६ जणांना सुवर्णपदक मिळाले असून या…
वसंत भोईर,वाडा सर्दी,खोकला,तापाचे रुग्ण वाढले, गेल्या काही दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत.कधी उन्हाळा तर कधी गारवा तर मध्येच पावसाचा शिडकावा,या अशा संमिश्र वातावरणामुळे लहान मुलांचे आरोग्य बिघडू लागले आहे.त्यातच आईस्क्रीम,सरबते,कोल्ड्रिंक आदीचे सेवन मोठ्या प्रमाणावर करत असल्याने मुलांचे आरोग्य बिघडत आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होऊ नये,यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना जन्मापासून ठराविक वयापर्यंत वेळेवर लस देणे गरजेचे आहे.त्यामुळे पालकांनी ही काळजी घ्यायला हवी. सध्या वातावरणात संमिश्र बदल होत आहेत. उन्हाचा कडाका सहन करावा लागतो.दिवसा वाढलेले तापमान तर रात्री किंवा पहाटे गारवा जाणवतो. त्यामुळे या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. यातून वेगवेगळे…
दीपक मोहिते, वसई महसूल विभागाची वेगवान मोहीम… ” जिवंत सातबारा मोहीमे,”तून ७/१२ उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार, सातबाऱ्यावरील मयताच्या नावांमुळे खरेदी-विक्री व्यवहार,कर्ज प्रकरणासह अनेक अडचणी येतात. सातबाऱ्यावरील ही अडचण दूर करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १०० दिवसाच्या कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत १ एप्रिलपासून “जिवंत सातबारा मोहीम,” राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वसई तालुक्यात १ ते ५ एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करतील. ६ ते २० एप्रिल दरम्यान वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे ( मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख किंवा स्वयं…
जव्हार प्रतिनिधी, मुख्याध्यापिका प्रज्ञा शरद मुकणे यांचा भव्य सेवानिवृत्तीचा भव्य सोहळा संपन्न, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या गीतेतील उक्तीनुसार आपली जबाबदारी पार पाडणाऱ्याbप्रज्ञा शरद मुकणे ( उच्च श्रेणी मुख्याध्यापिका,जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा काळीधोंड ) या काल वयोमानानुसार सेवेतून सेवानिवृत्त झाल्या.या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समिती व काळीधोंड शाळेच्या वतीने त्यांचा भव्य सेवापूर्ती सोहळा पार पडला. या सोहळ्यास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिभाऊ बोरसे अध्यक्षस्थानी होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रावण खरपडे,पंचायत समितीचे माजी गट शिक्षणाधिकारी चौधरी,तसेच धानोशी गटाचे केंद्रप्रमुख चंदनसिंग जगताप उपस्थित होते.याशिवाय केंद्रातील सर्व शिक्षक,शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारमूर्ती प्रज्ञा मुकणे यांना…
अनंत भोईर,पालघर, मुख्य कार्य. अधिकारी मनोज रानडे यांनी साधला पत्रकारांसोबत संवाद, पालघर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आज पत्रकारांसोबत औपचारिक परिचय करून घेतला.यावेळी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक पत्रकारांचा परिचय करून घेतला आणि त्यांच्यासोबत सुसंवाद साधला. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी जिल्ह्यात काम करताना कुपोषण, आरोग्य,शिक्षण आणि पाणीपुरवठा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला जाईल, ” जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण, शिक्षणाच्या सुविधा आणि पाणीटंचाई यावर विशेष लक्ष दिले जाईल.त्यासाठी परिणामकारक उपाययोजना केल्या जातील.” असे स्पष्ट केले. संवादा दरम्यान पत्रकारांनी जिल्ह्यातील विविध समस्यांवर सखोल चर्चा केली.त्यांनी कुपोषण,बालमृत्यू,मातामृत्यू, स्थलांतर,बोगस डॉक्टरांची समस्या,घरकुल योजना, जलजीवन…
