दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पोलिसांनी प्रेक्षकांना नोटीसा देणे,ही कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी,
कुणाल कामरा याला जेरबंद करण्यासाठी राज्य सरकार जंग जंग पछाडत आहे.पण कुणाल कामराही दररोज नवनवीन व्हिडीओ व ट्विट करून सरकारला डीवचत आहे.कुणाल कामरावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू झाले आहे.मात्र कुणाल कामरा मात्र राज्य सरकार व पोलिसांची खिल्ली उडवण्यात गर्क आहे.तो दररोज नवीन व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करत सुटला आहे.
कुणाल कामराच्या त्या गाण्याला देश व परदेशातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.कुणाल कामरा यांच्या बँक खात्यामध्ये परदेशातून दररोज हजारो डॉलर्स जमा करण्यात येत आहेत.आतापर्यंत त्याच्या खात्यात पाच कोटी रु.जमा झाले आहेत.कुणाल हा हजर होत नसल्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे.पोलिसांच्या या कृतीचे जनमानसामध्ये जोरदार पडसाद उमटू लागले आहेत.दरम्यान प्रेक्षकांना नोटीसा देण्याच्या पोलिसांच्या कृती निषेध करणारा ट्विटही कुणाल कामरा याने केला आहे.महायुती सरकार व कुणाल कामरा यांच्यामध्ये सुरू असलेला वाद येणाऱ्या काळात विकोपाला जाण्याची शक्यता आहे.प्रेक्षकांना नोटीसा देणे,हा प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे असून भारतीय संविधानातील अनुच्छेद १९ ( क ) चे उल्लंघन असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.कुणाल कामरा हा जरी हजर झाला तरी एकनाथ शिंदे गट व पोलिसांना कुणाल कामरा यांनी ज्या व्यक्तिवर टीका केली,ती व्यक्ती एकनाथ शिंदे हीच आहे,हे न्यायालयात सिद्ध करावे लागणार आहे.कारण कुणाल कामरा याने आपल्या गाण्यात कुठंही शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही.रिक्षावाला,दाढीवाला,गुवाहाटीला जाणारा व गद्दार,मीच आहे,हे जर सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला तर ते शिंदे यांना राजकीयदृष्ट्याही परवडणारे नाही.त्यामुळे कुणाल कामरा याला कायद्याच्या कचाट्यात अडकवता येणे,अशक्य आहे.

