संजय लांडगे,वाडा
जीवशास्त्र विषयात वाड्याचे प्रसाद इसामे यांना सुवर्णपदक,
वाड्याचे प्रसाद इसामे यांनी मुंबई येथील डॉ.होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमधून जीवनशास्त्र ( प्राणीशास्र ) या विषयात पदव्युत्तर शिक्षणात सुवर्ण पदक पटकावत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या यशाची दखल घेत अभ्यास अकॅडमीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे येथील रहिवासी असलेले प्रसाद इसामे,हे सध्या वाडा येथे राहत आहेत.खाजगी क्लासेसमध्ये शिकवून त्यांनी आपले पुढील उच्च शिक्षण चालू ठेवले होते.पुढे त्यांनी डॉ.होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पदव्युत्तर शिक्षणात जीवनशास्त्र ( प्राणीशास्र ) या विषयात १० पैकी १० गुण मिळवत सुवर्ण पदक मिळवले.या युनिव्हर्सिटीमधून ६ जणांना सुवर्णपदक मिळाले असून या सहामध्ये देखील प्रसाद इसामे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ग्रामीण भागातील एखाद्या तरुणाने डॉ.होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये केलेली ही कामगिरी असामान्य असून त्यांची दखल अभ्यास अकॅडमी यांनी घेऊन दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभावेळी प्रसाद इसामे यांचा सत्कार केला.

