वसंत भोईर,वाडा
सर्दी,खोकला,तापाचे रुग्ण वाढले,
गेल्या काही दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत.कधी उन्हाळा तर कधी गारवा तर मध्येच पावसाचा शिडकावा,या अशा संमिश्र वातावरणामुळे लहान मुलांचे आरोग्य बिघडू लागले आहे.त्यातच आईस्क्रीम,सरबते,कोल्ड्रिंक आदीचे सेवन मोठ्या प्रमाणावर करत असल्याने मुलांचे आरोग्य बिघडत आहे.
मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होऊ नये,यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना जन्मापासून ठराविक वयापर्यंत वेळेवर लस देणे गरजेचे आहे.त्यामुळे पालकांनी ही काळजी घ्यायला हवी.
सध्या वातावरणात संमिश्र बदल होत आहेत. उन्हाचा कडाका सहन करावा लागतो.दिवसा वाढलेले तापमान तर रात्री किंवा पहाटे गारवा जाणवतो. त्यामुळे या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. यातून वेगवेगळे आजार होत आहेत.मुले उन्हात खेळतात उन्हाने खूप तहान लागल्यावर थंड पाणी,थंड सरबते, आईस्क्रीम खातात,कोल्ड ड्रिंक्स घेतात.यामुळे या कालावधीत मुले सर्दी,ताप,खोकला,या आजाराचे रुग्ण बनू लागली आहेत.
थंड पदार्थ देणे टाळा: मुलांना फ्रिज मधील किंवा अतिशय थंड पदार्थ,पेये देणे टाळावे.या पदार्थामुळे मुलांना खोकला किंवा सर्दी,ताप आदी आजारांचा त्रास होतो.
मुलांना उघड्यावरचे पदार्थ देऊ नयेत,त्यावर माशा बसलेले असतात किंवा धुल असते अशा पदार्थामुळे मुलांचे आरोग्य बिघडते.त्यामुळे अतिशय कडक उन्हात मुलांना खेळायला पाठवू नका.
मुले उन्हातून खेळून आल्यावर थंडगार पाणी किंवा शीतपेय पितात.त्यामुळे त्यांना सर्दी, खोकला,ताप येतो. उघड्यावरील पदार्थही हानिकारक असतात.त्यामुळे मुलांना उघड्यावरील किंवा थंड पाणी,पदार्थ देऊ नयेत.
-डाॅ. जयेश पाटील

