- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, वसई विरार मनपाच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदारराजा काय करणार ? महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत विरार,नवघर – माणिकपूर,वसई,नालासोपारा, नायगाव जुचंद्र,पेल्हार,सातिवली वालीव व कामण,या भागात कशा लढती होतील ? याविषयी ढोबळ अंदाज, १ ) विरार – बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप, २ ) नवघर माणिकपूर – बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप/ शिंदे गट,क्रमांक ३ वर शिवसेना ( उबाठा ) ३ ) वसई – भाजप विरुद्ध बहुजन विकास आघाडी, ४ ) नालासोपारा – भाजप/ शिवसेना ( शिंदे गट ) विरुद्ध शिवसेना ( उबाठा ) बहुजन विकास आघाडी, ( येथे बविआने नविन चेहऱ्यांना संधी दिल्यास थोडेफार यश मिळू शकेल.तेही पक्षातील अंतर्गत मतभेद व…
वसई,पालघर,विक्रमगड,तलासरी,जव्हार, पालघर जिल्ह्यात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा, काल वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विक्रमगड,जव्हार,तलासरी, तालुक्यात “आंतरराष्ट्रीय योग दिन,” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ” योग सत्राचे,” आयोजन करण्यात आले होते. योग सत्रामध्ये योग प्रशिक्षक व सहकारी प्रशिक्षकांतर्फे विविध प्रकारची योगासने सादर करण्यात आली.उपस्थित मान्यवर, मनपा अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी यांनीही योगासने करीत त्यास उत्तम प्रतिसाद दिला.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मनिष धानू,डहाणू बुलेट ट्रेन ; लांबीचा बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आला. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एन.एच.एस.आर.सी.एल) ने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या महाराष्ट्र विभागातील डहाणू तालुक्यातील साखरे गावात ४० मी.लांबीचा पहिला पूर्ण लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) बॉक्स गर्डर यशस्वीरित्या नुकताच बसवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मार्ग १५६ कि.मी.लांब असून त्यामध्ये खालील टप्प्याचा समावेश आहे. • वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स ( मुंबई उपनगर ) येथे एक भुयारी स्थानक, • मुंबईतील वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाण्याच्या शिळफाटा दरम्यान २१ कि.मी.लांबीचा बोगदा • शिळफाटा ते झरळी गाव ( महाराष्ट्र-गुजरात सीमा,) पर्यंत १३५कि.मी.उंचावरील मार्गिकेचा समावेश आहे अ.१२५ कि.मी.लांबीचा व्हायाडक्टचा समावेश आहे • १०३ कि.मी.लांबीचा…
वसंत भोईर,वाडा संरक्षक भिंतीच्या बांधकामात केला दगडांचा वापर ; भिंत पाडण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश वाडा नगरपंचायत हद्दीत कवटेपाडा रस्त्यालगत नगरपंचायतीतर्फे सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामात ठेकेदाराने सर्रास दगडांचा ( डबर ) वापर करत निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले आहे. याविरोधात तक्रारी झाल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने हे संरक्षक भिंतीचे बांधकाम पाडण्याचे आदेश ठेकेदाराला बजावले आहेत. त्यामुळे विकासकामांतील भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाले आहे. वाडा नगरपंचायत हद्दीतील कवटेपाडा मधील बांबेरे यांच्या घरालगत संरक्षक भिंत बांधणे, हे सुमारे ९० लाख रु. अंदाजपत्रकीय तरतूद असलेले काम माही कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आले होते.या ठेकेदाराने संरक्षक भिंतीचे बांधकाम करताना राजरोसपणे दगडांचा ( डबर ) वापर केल्याचे वृत्त दैनिक…
दीपक मोहिते, बविआशी ” साथसंगत नको रे बाबा,” काँग्रेसजनांची प्रखर भूमिका, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली वसई विरार जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक टिळक भवनात नुकतीच पार पडली.या बैठकीला प्रमुख पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली होती.वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी प्रदेशाध्यक्षपदी असलेले नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यात काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.राज्यातही पक्षाची प्रचंड वाताहत झाली.त्यामुळे नाना पटोले याना पक्षश्रेष्टींनी डच्चू दिला व त्यांच्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लावली.पण गेल्या सहा महिन्यांच्या काळात सपकाळ हे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” धुपप्रतिबंधक बंधारा नसल्यामुळे भुईगाव समुद्रकिनाऱ्यावरील वनसंपदा धोक्यात, ५ जून रोजी राज्यात सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.जनजागृती,चर्चासत्रे, भित्तीपत्रके तसेच अनेक उपक्रम या दिनी राबवण्यात आले.त्यानंतर मात्र सर्वत्र सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यात दररोज पर्यावरण विषयक असलेल्या कायद्याची पावलोपावली पायमल्ली होत असते.वृक्षतोड,वाळूचोरी,जंगल परिसरात होणारी मातीचोरी व अनधिकृत दगडखाणी इ.गैरप्रकारामुळे पालघर जिल्हा अत्यंत संवेदनशील असा बनला आहे.गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस,वादळी वारे व प्रचंड उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्याची प्रचंड धूप होत आहे.गेल्या आठवडाभरात भुईगाव या निसर्गरम्य समुद्रकिनारी आदळलेल्या लाटांमुळे झाडांची मोठ्याप्रमाणात पडझड झाली.या समुद्रकिनारी धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा,अशी मागणी गेल्या तीन…
वसंत भोईर, वाडा शेतीचे शिवारे भरली तुडूंब ; भातपेरणीची कामे पडली लांबणीवर, तालुक्यात गेल्या १३ जून पासून मान्सून सक्रिय झाला असून गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.शेतीची कामे योग्य वेळेत होत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. वाडा तालुक्यात पाच दिवसांपासून सतत पाऊस सुरु असून शेतं,ओहोळ,नदी, नाले,दुथडी भरून वाहत आहेत तसेच शेतीची शिवारे देखील तुडूंब भरली आहेत. पेरणी कशी आणि कुठे करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.सततच्या कोसळणाऱ्या पावसाने भातपेरणीची कामे लांबणीवर पडली आहेत.तर काही शेतकऱ्यांनी भात बियाणांची पेरणी केल्यामुळे आता ती कुजून वाया…
सचिन परब,वसई वसई – नवघर पूर्वेस औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट, नवघर पूर्वेस औद्योगिक वसाहतीत एका औद्योगिक गाळ्यात स्फोट झाला.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाळ्याचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेमध्ये एकजण जखमी झाला आहे.येथे काम करणाऱ्या पाच जणांना वाचवण्यात आले आहे. वसई पुर्वेस औद्योगिक वसाहत आहे.या वसाहतीत शेकडो लहानमोठे कारखाने आहेत.काल मनीष इंडस्ट्री नं.१ मधील पहिल्या मजल्यावरील गाळा नंबर ११४ मध्ये सकाळी ८:३० च्या सुमारास अचानक एक भीषण स्फ़ोट झाला.प्रथमदर्शनी वातानुकूलित यंत्रणेत हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की गाळाचे ग्रील,सज्जे उडून शेजारच्या दुस-या इमारतीवर जाऊन धडकले.या दुर्घटनेत ११३ नंबर तसेच…
वसंत भोईर,वाडा वाड्यातील तीन ब्रिटिशकालीन पुल धोकादायक अवस्थेत, भिवंडी- वाडा- मनोर महामार्गावर तानसा नदीवरील डाकीवली फाटा,वैतरणा नदीवरील गांधरे,पिंजाळ नदीवरील पाली असे ब्रिटिशकालीन तीन पूल आहेत.यापैकी पाली येथील पुलाची थोडीफार डागडूजी करण्यात आली आहे.परंतु डाकिवली फाटा आणि गांधरे येथील पुलांची दुरुस्ती झाली नसल्यामुळे या दोन्ही पुलांवर मोठे खड्डे पडले आहेत.जड वाहनांचे सतत हादरे बसत असल्यामुळे पुलांची परिस्थिती धोकादायक झाली असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. वैतरणा आणि तानसा या दोन नद्यांवर असलेले हे दोन्ही पूल ब्रिटिशकालीन असून त्यांची दुरुस्ती झाली न झाल्यामुळे या पुलांची दुरावस्था झाली आहे. या पुलावरून दररोज हजारोंच्या संख्येने अवजड वाहनांची वाहतूक होत असते.त्यामुळे प्रशासनाकडून या दोन्ही पुलांची पाहणी…
सुरेश काटे,तलासरी रसायनाची वाहतूक करणारा ट्रेलर टँकर उलटला,तीन तास वाहतूक विस्कळीत, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काजळी गावाच्या हद्दीत, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर धोकादायक वळणावर ट्रेलर टँकर उलटून अपघात झाला. अपघातानंतर ट्रेलर टँकर मधून हायड्रोक्लोरिक ऍसिडची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली.त्यामुळे परिसरातील नागरिक आणि चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान मुसळधार पाऊस सुरू असल्याने गळती झालेले रसायन परिसरातील शेतीत गेल्यामुळे झाडे जळली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काजळी येथे काल दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या अपघातातील ट्रेलर टँकरमधून हायड्रोक्लोरिक ॲसिडची गळती सुरु झाली. ट्रेलर टँकर मधून निघणार्या धुरामुळे परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले…
