वसई,पालघर,विक्रमगड,तलासरी,जव्हार,
पालघर जिल्ह्यात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा,
काल वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विक्रमगड,जव्हार,तलासरी, तालुक्यात “आंतरराष्ट्रीय योग दिन,” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ” योग सत्राचे,” आयोजन करण्यात आले होते.
योग सत्रामध्ये योग प्रशिक्षक व सहकारी प्रशिक्षकांतर्फे विविध प्रकारची योगासने सादर करण्यात आली.उपस्थित मान्यवर, मनपा अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी यांनीही योगासने करीत त्यास उत्तम प्रतिसाद दिला.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

