दीपक मोहिते,
वसई विरार मनपाच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदारराजा काय करणार ?
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत विरार,नवघर – माणिकपूर,वसई,नालासोपारा, नायगाव जुचंद्र,पेल्हार,सातिवली वालीव व कामण,या भागात कशा लढती होतील ? याविषयी ढोबळ अंदाज,
१ ) विरार – बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप,
२ ) नवघर माणिकपूर – बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप/ शिंदे गट,क्रमांक ३ वर शिवसेना ( उबाठा )
३ ) वसई – भाजप विरुद्ध बहुजन विकास आघाडी,
४ ) नालासोपारा – भाजप/ शिवसेना ( शिंदे गट ) विरुद्ध शिवसेना ( उबाठा ) बहुजन विकास आघाडी, ( येथे बविआने नविन चेहऱ्यांना संधी दिल्यास थोडेफार यश मिळू शकेल.तेही पक्षातील अंतर्गत मतभेद व मनभेद बाजूला सारून जर मैदानात उतरले,तरच ते शक्य होऊ शकते.
५ ) नायगाव/जुचंद्र – येथे भाजप / शिवसेना ( शिंदे गट ) संयुक्तपणे मैदानात असण्याची शक्यता आहे. विरुद्ध बहुजन विकास आघाडी,येथे बविआला माफक प्रमाणात यश मिळू शकते.
६ ) पेल्हार व कामण – बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप / शिवसेना ( शिंदे गट ) येथे भाजपला मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे भाजप या भागात शिवसेनेला ( शिंदे गट ) बऱ्यापैकी जागा सोडण्याची शक्यता आहे.
७ ) सातिवली/ वालीव – बहुजन विकास आघाडी, मनसे व भाजप यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.या दोन्ही ठिकाणी मनसेचे पारडे जड आहे.
८ ) विरार पूर्व व पश्चिम भागात बहुजन विकास आघाडीने नव्या चेहऱ्यांना संधी दिली नाहीतर,त्यांच्या या गडात त्यांना दगाफटका होऊ शकतो.पूर्व भागातील नारिंगी, चिखलडोंगरे चंदनसार,कोपरी,सहकारनगर या भागात सहकारनगर वगळता इतर भागात आगरी समाजाचे चांगले प्रबाल्य आहे. या समाजात आगरी सेनेचे कैलाश पाटील भरपूर कामे केली आहेत.अनेकांच्या जमिनीचे प्रश्न मार्गी लावले आहेत.त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो., भाजप या भागात कैलाश पाटील व बहुजन विकास आघाडीच्या एका माजी नेत्याला हाताशी धरून मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे.या नेत्याने, ” माझ्या क्षेत्रातील सहाही जागा कोणत्याही परिस्थितीत मी पाडणारच,असे जाहीर केले आहे.या नेत्याशी पालकमंत्री गणेश नाईक व भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष संपर्क साधून आहेत.तसेच मनवेलपाडा / संतनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते महत्वाची कामगिरी बजावतील.गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोघांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील आचोळे व तुळींज,या भागातही भाजप चांगली खेळी करेल,कारण या भागात गुजराती,उत्तर भारतीय व मारवाडी हे बहुसंख्येने राहतात.ते कायम भाजपचे पाठीराखे राहिले आहेत.त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी भाजप,गुजरात, उत्तर प्रदेश व राजस्थान या राज्यातून आरएसएस व विश्व हिंदू परिषदेची कुमक पाठवण्याची शक्यता आहे.

