Author: दीपक मोहिते

वसंत भोईर,वाडा हिंदीची सक्ती ; शासन निर्णयाची कुडूसमध्ये होळी, हिंदी सक्ती विरोधात मनसे, शिवसेना( उबाठा )काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज संपूर्ण राज्यभरात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करून आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज कुडूस नाका येथे शासन निर्णयाची होळी केली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे,पालघर सहसंपर्क प्रमुख गोविंद पाटील,माजी सभापती अस्मिता लहांगे,माजी पंचायत समिती सदस्य राजेश सातवी,प्रकाश पाटील,योगेश भानुशाली,प्रकाश भोईर, किशोर पाटील,संतोष पाटील, दामोदर लाड,परशुराम भोईर, राकेश खिसमतराव,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, काँग्रेसचे इरफान सुसे,रामदास जाधव,मनसेचे दिलीप सांबरे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी…

Read More

सुरेश काटे,तलासरी सूत्रकार येथील पूल अवजड वाहनासाठी बंद, महाराष्ट्र राज्यातील सूत्रकार येथून केंद्रशासित दादरा नगर हवेली राज्यात जाणाऱ्या मार्गांवरील सूत्रकार काकडपाडा येथील पूल आवजड वाहनासाठी बंद करण्यात आला असून येथून येजा करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला आहे. सूत्रकार येथील काळू नदीवरील पूल धोकादायक नसला तरी पूल अरुंद असल्यामुळे अवजड वाहनाच्या सततच्या वाहतूकीमुळे पूल नादुरुस्त होण्याची शक्यता आहे.या पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून तांत्रिक कारणामुळे पुलाचे काम बाकी आहे.रस्ता रुंद करण्यात आला असला तरी पुलाचे काम शिल्लक आहे.त्यामुळे या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. दादरा नगर हवेलीमधून सूत्रकार तलासरीकडे येणारी वाहने उधवा तलासरी मार्गे महामार्गावरून…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” हिंदी भाषेची सक्ती ; मराठी भाषिकांचे दुर्देव म्हणावे लागेल… केंद्र सरकारने गेल्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला.या घटनेमुळे मराठी जनतेच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.पण त्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या छुप्या अजेंड्याला पाठीशी घालत हिंदीची सक्ती करण्याबाबत हालचालीना सुरुवात केली आहे.त्यामुळे जनतेचा आनंद केवळ अल्पकाळ टिकला.सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्याच्या जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.राज्य सरकारच्या या आततायी निर्णयामुळे येत्या ५ जुलै रोजी मराठी भाषिकांचा मोर्चा निघणार आहे.या निमित्ताने उद्धव व राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.त्यांच्या एकत्र येण्यामुळे हा मोर्चा विराट स्वरूपाचा असेल,यामध्ये कोणालाही शंका वाटण्याची गरज नाही.या सर्व घडामोडीमुळे भाजपच्या…

Read More

दीपक मोहिते, ” व्यक्तिविशेष,” रविंद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड ; भाजप,स्था.स्व.सं.ही खिश्यात घालणार… भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.गेल्या पाच वर्षात कोकण प्रदेशातील तमाम निवडणुकीत चव्हाण यांनी केलेली दैदिप्यमान कामगिरी लक्षात घेता त्यांच्यावर लवकरच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत होते.त्यानुसार त्यांची आता वर्णी लागली आहे.यासंदर्भात पक्षातर्फे अधिकृत घोषणा झाली नसली तरी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रविंद्र चव्हाण यांचा जन्म २० सप्टेंबर १९७० रोजी झाला.त्यांच्या राजकीय जीवनाला तेवीस वर्षांपूर्वी ( २००२ साली ) सुरुवात झाली.सन २००५ मध्ये ते कल्याण – डोंबिवलीमहानगरपालिकेत सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले.त्यानंतर २००९,२०१४,२०१९ व २०२४ असे चारवेळा विधानसभेवर…

Read More

सुरेश वैद्य,पालघर डहाणू येथे ड्रोन सर्व्हेबाबत बैठक संपन्न, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण येथे उभारण्यात येणाऱ्या महत्वकांक्षी अशा वाढवण बंदर प्रकल्पासाठी आयटीडी कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या ड्रोन सर्वेला वाढवण येथील काही स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता.मात्र संबंधित कंपनीने सर्वे पूर्ण केला होता. आंदोलनकर्त्या ग्रामस्थांना प्रकल्पाविषयी योग्य ती माहिती देऊन त्यांच्या भावना व मागण्या जाणून घेण्याच्या उद्देशाने काल जिल्हा प्रशासनाने बैठक आयोजित केली होती.सदर बैठक उपविभागीय अधिकारी डहाणू यांचे कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीला विशाल खत्री,(भा.प्र.से.) सहा. जिल्हाधिकारी डहाणू, जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी महेश सागर उपस्थित होते.तसेच बैठकीला वरोर,धाकटी डहाणू,चिंचणी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ,वरोरचे ग्रामपंचायत सदस्य कुणाल राऊत,अनिकेत पाटील,…

Read More

दीपक मोहिते, देश एका भयावह वळणावर – भाग क्र.-१ देशाची वाटचाल आर्थिक खाईच्या दिशेने सुरू…. देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण होत आली आहेत.या प्रदीर्घ वाटचाली नंतर तो आता एका भयावह वळणावर येऊन पोहोचला आहे.कोणी कितीही दावे करोत,पण देशाचा चेहरा पार काळवंडला गेला आहे.आपले नराधम राजकारणी देशाच्या पुरोगामी चेहऱ्यावर धर्मांधतेचे काळे फासण्यात यशस्वी झाले आहेत.त्यामुळे देशाची आर्थिक,सामाजिक व सांस्कृतिक,घडी पार विस्कळीत झाली आहे.सत्ता ही गोरगरिबांच्या उत्थानासाठी नाहीतर ओरबडण्यासाठी असते,असा गैरसमज करून घेऊन गेल्या आठ दशकात राजकारण्यांनी आपला देश लुटला.अक्षरशः देशाचे लचके तोडले.धर्मवादाने समाजवादाचा फडशा पाडला.अशी परिस्थिती असताना देखील आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला देश पाच ट्रीलियन डॉलर्सची अर्थव्यवस्थेच्या दिशेने…

Read More

सुरेश काटे,तलासरी  ‘राणी दुर्गावती नर्सरी’ ठरतेय पर्यावरणाचे प्रतीक, तलासरी तालुक्यातील पीएम श्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा,वरवाडा येथे नुकताच एक आगळावेगळा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला.शाळेतील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ‘राणी दुर्गावती नर्सरी,’मध्ये तब्बल पंधराशे झाडांची रोपे तयार करण्यात आली. या नर्सरीतून फुलझाडे, शोभेची झाडे,तसेच विविध उपयोगी वनस्पतींची रोपे तयार करण्यात आली.आणि ती शाळेच्या आवारात तसेच शेजारी असलेल्या गोलेरी डोंगरीवर लावण्यात आली. डोंगरी भागात जेथे पूर्वी मोकळं आणि रखरखीत वातावरण होतं,तेथे आता हिरवळ पसरू लागली आहे. हा उपक्रम केवळ वृक्षारोपणाचा नव्हे,तर विद्यार्थिनींच्या पर्यावरणविषयक जाणीव, समर्पण आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनाचा ठोस पुरावा आहे. यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन…

Read More

दिपक मोहिते, ” रणसंग्राम,” तरच बहुजन विकास आघाडी,भाजपचा अश्वमेघ घोडा रोखू शकेल…. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून प्रभाग रचना व मतदारांच्या यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.दिवाळीनंतर या निवडणुका होण्याची शक्यता आहे.प्रभाग रचना करताना सर्वच राजकीय पक्षानी दक्ष राहण्याची गरज आहे.सत्तेत असलेला पक्ष,आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला पाडण्यासाठी आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना करण्याची कट कारस्थाने करत असतो.यापूर्वी अनेक महानगरपालिका निवडणुकीत अशाप्रकारची कटकारस्थाने अनुभवायला मिळाली आहेत.अशा गैरकृत्यामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी व निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील सामील असतात.यामध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक देवाण घेवाण होत असते.त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला या प्रक्रियेवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे. एकीकडे निवडणूक…

Read More

वसंत भोईर,वाडा श्रमजीवी संघटनेचे आंदोलन स्थगित, भिवंडी- वाडा- मनोर या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात श्रमजीवी संघटनेने नुकतेच रास्ता रोको आंदोलन केले. डाकिवली फाटा,कुडूस,शिरीष पाडा,खंडेश्वरी नाका या चार ठिकाणी एकाच वेळी रस्ता कार्यकर्त्यांनी रोको आंदोलन केले. तब्बल बारा तास चाललेले हे आंदोलन रात्री ११.३० वाजता लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.संघटनेचे शिष्टमंडळ आणि ठाणे व पालघर जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे,कार्यकारी अभियंता सचिन पाटील,वाडा उपविभागीय अधिकारी संदीप चव्हाण,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झाल्टे पाटील,जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे भिवंडी तहसीलदार अभिजीत खोले,वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे,ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे,यांच्यासह महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चेनंतर मार्ग निघाला. या…

Read More

दीपक मोहिते, ” रणसंग्राम,” शिवसेना ( उबाठा ) / मनसे युती ; अखेर घोडं गंगेत न्हालं, भाजपच्या गोटात अस्वस्थता… गेल्या तीन महिन्यापासून उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांच्या एकत्र येण्यावरून जोरदार चर्चा सुरू होती.अखेर काल या दोघांनी एकमेकांना टाळी दिली.हे दोघे भाऊ एकत्र येऊ नयेत,यासाठी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे हे दोघे पाण्यात देव टाकून बसले होते.पण या दोघांना पाण्यातील देव काही बाहेर काढता आले नाहीत.या दोघांच्या एकत्र येण्याच्या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला धोका निर्माण होऊ शकतो.या दोघांच्या पक्षाचा हिंदी सक्तीच्या विरोधात आता संयुक्त मोर्चा निघणार आहे.त्यामुळे भाजपच्या गोटात सध्या अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. राज्यातील प्रत्येक…

Read More