सुरेश वैद्य,पालघर
डहाणू येथे ड्रोन सर्व्हेबाबत बैठक संपन्न,
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण येथे उभारण्यात येणाऱ्या महत्वकांक्षी अशा वाढवण बंदर प्रकल्पासाठी आयटीडी कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या ड्रोन सर्वेला वाढवण येथील काही स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता.मात्र संबंधित कंपनीने सर्वे पूर्ण केला होता. आंदोलनकर्त्या ग्रामस्थांना प्रकल्पाविषयी योग्य ती माहिती देऊन त्यांच्या भावना व मागण्या जाणून घेण्याच्या उद्देशाने काल जिल्हा प्रशासनाने बैठक आयोजित केली होती.सदर बैठक उपविभागीय अधिकारी डहाणू यांचे कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीला विशाल खत्री,(भा.प्र.से.) सहा. जिल्हाधिकारी डहाणू, जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी महेश सागर उपस्थित होते.तसेच बैठकीला वरोर,धाकटी डहाणू,चिंचणी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ,वरोरचे ग्रामपंचायत सदस्य कुणाल राऊत,अनिकेत पाटील, धाकटी डहाणूचे मच्छिमार बांधव गणेश मर्धे,केतन दवणे व इतर मच्छिमार बांधव व विवेक कुलकर्णी उपस्थित होते.
एनएचएआयच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या वाढवण ग्रिनफील्ड महामार्ग या रस्त्यासाठी अधिग्रहीत होणाऱ्या जमिनीसाठी जास्त भाव /मोबदला शासनाने द्यावा,अशी मागणी उपस्थित नागरीकांनी केली.तसेच प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच रोजगार देण्यात यावा, रोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात यावे,अशा विविध प्रकारच्या मागण्या उपस्थित नागरीकांकडून करण्यात आल्या.त्याला उत्तर देतांना उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधन्य देण्याचे जेएनपीटीने मान्य केल्याचे सांगितले.इतर मागण्याबाबत शासनाकडे पाठपूरावा करु असे,आश्वासन उपस्थित नागरीकांना देण्यात आले.
तसेच प्रस्तावित बंदरामुळे मच्छिमारांसाठी नुकसानभरपाई धोरण ठरवण्यासाठी सर्वे करण्यात येत आहे. सदर सर्व्हे करण्यासाठी एका पर्यावरण कंपनीला काम देण्यात आले आहे.सदर कंपनीचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली.
ज्या आंदोलनकर्त्यानी या बैठकीची मागणी केली होती,ते मात्र या बैठकीस अनुपस्थित होते, तरीसुध्दा शासनाने संवेदनशीलता दाखवत सदर बैठक तातडीने अयोजित केली,असे असतानाही आंदोलनकर्ते अनुपस्थित राहिले.

