वसंत भोईर,वाडा
हिंदीची सक्ती ; शासन निर्णयाची कुडूसमध्ये होळी,
हिंदी सक्ती विरोधात मनसे, शिवसेना( उबाठा )काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज संपूर्ण राज्यभरात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करून आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज कुडूस नाका येथे शासन निर्णयाची होळी केली.
यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे,पालघर सहसंपर्क प्रमुख गोविंद पाटील,माजी सभापती अस्मिता लहांगे,माजी पंचायत समिती सदस्य राजेश सातवी,प्रकाश पाटील,योगेश भानुशाली,प्रकाश भोईर, किशोर पाटील,संतोष पाटील, दामोदर लाड,परशुराम भोईर, राकेश खिसमतराव,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, काँग्रेसचे इरफान सुसे,रामदास जाधव,मनसेचे दिलीप सांबरे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी वाडा,अबिटघर येथेही शासन निर्णयाची होळी करण्यात आली.

