वसंत भोईर,वाडा,
चिंचघर – देवघर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बि-हाड मोर्चाचे आयोजन,
तालुक्यातील चिंचघर-देवघर या रस्त्याची दुरावस्था झाली असून सर्वत्र खड्डे पडले आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप होत आहे.या रस्त्यावरून वाहने चालवणाऱ्यांची भीतीने गाळण उडत असते.रस्त्याच्या अशा दुरावस्थेमुळे शालेय विद्यार्थी व रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा अन्यथा सोम.२८ जुलै रोजी धर्मवीर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पष्टे यांच्या नेतृत्वाखाली बि-हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याबाबत वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देण्यात आले आहे.
या रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात या परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडून त्याला केराची टोपली दाखवल्यामुळे शेतकरी,विद्यार्थी,रुग्ण यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे,म्हणून या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून रस्ता सुस्थितीत करून द्यावा,मागणीसाठी बि-हाड मोर्चा काढून आंदोलन छेडण्याचा इशारा धर्मवीर विचार मंचातर्फे प्रशासनाला देण्यात आला आहे.

