वसंत भोईर, वाडा
ग्रामस्थानी तब्बल तीन तास रोखला खानिवली- कंचाड रस्ता,
वाडा तालुक्यातील खानिवली – कंचाड रस्त्याची पूर्ण वाताहात होऊन ठिकठिकाणी पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा व अवजड वाहतूक बंद करा या मागणीसाठी काल देवळी फाटा येथे ग्रामस्थांनी रोको आंदोलन केले. दरम्यान वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
खानिवली – कंचाड या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.त्यामुळे या रस्त्यावर अपघात वाढले असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे.तत्पूर्वी अनेक वेळा अर्ज विनंती करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने आज अखेर या परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.त्याची दखल घेत तहसीलदारांनी मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिले.त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.
यावेळी गो-हे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल खिल्लारे,कैलास पाटील,वैभव पाटील,रमेश ठाकरे,व हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

