वसंत भोईर,वाडा
वाड्यात मनसे व शिवसेनेकडून ( उबाठा ) सरकारचा निषेध,
मीरा – भाईंदरमध्ये एका गुजराती व्यापा-याला मारहाण केल्यावरून मोर्चा काढण्यात आला होता.त्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मीरा भाईंदर शहरात मराठी एकीकरण समिती व महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना यांच्यातर्फे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारून कार्यकर्त्यांची धडपकड केल्याच्या निषेधार्थ वाड्यात मनसे व शिवसेनेकडून वाडा बसस्थानकासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली., सरकार व पोलीस यांचा निदर्शकानी जोरदार निषेध केला.कार्यकर्त्यांनी यावेळी हाताला काळ्या रिबीनी बांधल्या होत्या.
या आंदोलनात मनसेचे तालुकाप्रमुख कांतीकुमार ठाकरे,शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख निलेश पाटील, मनसे व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी दिपक ठाकरे, मधूर म्हात्रे,भरत गायकवाड, प्रमोद घोलप,उषा मोरे,कल्पना गोसावी, हेमंत जाधव,विकी काळे,संतोष भोमटे,कुणाल पाटील,महेश भगत,करण ठाणगे,ओमकार साळुंखे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

