सुरेश काटे,तलासरी
सूत्रकार येथील पूल अवजड वाहनासाठी बंद,
महाराष्ट्र राज्यातील सूत्रकार येथून केंद्रशासित दादरा नगर हवेली राज्यात जाणाऱ्या मार्गांवरील सूत्रकार काकडपाडा येथील पूल आवजड वाहनासाठी बंद करण्यात आला असून येथून येजा करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला आहे.
सूत्रकार येथील काळू नदीवरील पूल धोकादायक नसला तरी पूल अरुंद असल्यामुळे अवजड वाहनाच्या सततच्या वाहतूकीमुळे पूल नादुरुस्त होण्याची शक्यता आहे.या पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून तांत्रिक कारणामुळे पुलाचे काम बाकी आहे.रस्ता रुंद करण्यात आला असला तरी पुलाचे काम शिल्लक आहे.त्यामुळे या
पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. दादरा नगर हवेलीमधून सूत्रकार तलासरीकडे येणारी वाहने उधवा तलासरी मार्गे महामार्गावरून गुजरात,मुंबई कडे वळवण्यात आली आहेत. तसेच गुजरात,मुंबई बाजू कडून तलासरी सूत्रकार मार्गे जाणारी वाहने तलासरी, उधवा मार्गे दादरा नगर हवेली परिसरात वळवण्यात आली आहेत.२७ जून ते २६ जुलैपर्यंत वाहतूकीसाठी बंद राहणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी पालघर यांनी जाहीर केले आहे.
Trending
- वाढवण बंदर ; तिढा अधिक जटील होत चालला आहे,
- ग्रामीण भागातील खेडी समृद्ध होण्यासाठी शाश्वत विकासाची गरज,
- विरोधी पक्षाकडून ७.८ टक्के जीडीपी वाढीच्या आकडेवारीवर संशय व्यक्त,
- वसईत स्मार्ट मीटर विरोधात ७ सप्टें. रोजी सर्वपक्षीय आंदोलन,
- पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक प्रक्रिया वेगात सुरु,
- पालघर जिल्हा प्रशासन व वयम यांच्यात सामंजस्य करार,
- जव्हार येथे राष्ट्रवादी काँग्रेसची तिरंगा रॅली,
- वसई – विरारच्या विविध प्रश्नासाठी माजी खा. किरीट सोमय्या यांचा धावता दौरा,

