- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महानगरपालिका निवडणुका ; स्वच्छ चारित्र्य व प्रतिमा असलेल्या व्यक्तींना संधी न दिल्यास पुन्हा कपाळमोक्ष होण्याची शक्यता, भाजपचा उधळलेला अश्वमेघ घोडा रोखण्यासाठी ठाकरे बंधू यांनी काल गळ्यात गळा घालत मराठी माणसाच्या इच्छा व आकांक्षेवर फुंकर मारली.तर शरद पवार व अजित पवार हे दोघे काका – पुतण्या देखील अधून मधून एकत्र येण्याची भाषा करत आहेत.राज्यातील अनेक राजकीय कुटुंबे भाजपच्या कटकारस्थानामुळे गेल्या काही वर्षात दुभंगली गेली.वर्षानुवर्षे सत्तेची अनेक पदे उपभोगणारे एकनाथ शिंदे याना ईडीची भिती दाखवून भाजपने आपल्या गळाला लावले.अशी अनेक उदाहरणे गेल्या तीन ते चार वर्षात आपल्याला पहायला मिळाली.” सत्तेसाठी काय पण,” असे धोरण राबवत भाजपने अनेक…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ठाकरे बंधुचे मनोमिलन ; राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार… ज्या विजयी मेळाव्याची मराठी भाषिक जनतेला प्रतिक्षा होती,तो ऐतिहासिक मेळावा काल वरळी येथे मोठ्या उत्साहातकाल पार पडला.ठाकरे बंधूनी एकत्र यावे व महाराष्ट्राला वाचवावे,अशी जी अपेक्षा मराठी माणसाकडून व्यक्त करण्यात येत होती.त्यावर या विजयी मेळाव्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.या मेळाव्याला मराठी भाषिकांनी ” न भूतो,न भविष्यती,” अशी गर्दी केली होती.यावेळी राज ठाकरे यांनी या मेळाव्यानंतरही ” आम्ही एकत्रच राहणार आहोत,”अशी ग्वाही दिल्यानंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.दुसरीकडे मात्र या ऐतिहासिक मेळाव्यामुळे भाजप नेत्यांच्या पोटात मळमळ सुरू झाली आहे.शिंदे गटाने मात्र या मेळाव्याबाबत सावध भूमिका घेतली आहे.एकनाथ शिंदे,उदय सामंत व प्रताप सरनाईक…
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल, तालुक्यातील निंबवली – पालसई या रस्त्याची पार दुरावस्था झाली असून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असुन रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या वाहन चालकांना पाठदुःखीमुळे त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्यावरून वाहने चालवणाऱ्यांची भीतीने गाळण उडत आहे.तर,मिनी डोर व प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.त्यांना आठ कि.मी. अंतराचा प्रवास पायी करावा लागतो.त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका सचिव सागर पाटील यांनी बांधकाम प्रशासनाला दिला आहे. निंबवली- पालसई हा रस्ता १७ कि.मी.अंतराचा…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा संपन्न, भारती विद्यापीठ प्रशाला ज्युनिअर कॉलेज जव्हार येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक तरवारे के.पी.यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या पालखीचे व तुळशीचे पूजन करण्यात आले.यावेळी तरवारे के.पी. यांनी श्री पांडुरंगाच्या आषाढी एकादशीचे महत्त्व वारकरी परंपरेची पार्श्वभूमी,वारीचे महत्त्व,संतांनी जपलेली परंपरा अनेकविध संतांनी समाजाला दिलेली शिकवण,सामाजिक प्रबोधन समजून घेण्यासंदर्भात सविस्तर विवेचन केले.त्यानंतर श्री विठ्ठलाच्या नामस्मरणाचा गजर करण्यात आला.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री पांडुरंग व रखुमाई यांची वेशभूषा साकारली व संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ,संत चोखामेळा,संत मुक्ताबाई,संत जनाबाई व वारकरी भक्त मंडळी यांची पारंपारिक वेशभूषा साकारली. भारती विद्यापीठ प्रशाला व…
वसंत भोईर,वाडा खानिवली येथे मोरीला भगदाड, तालुक्यातील खानिवली-कंचाड मार्गावरील आनंद लक्ष्मण चंदावरकर हायस्कूल जवळ असलेल्या खानिवली येथील मोरीला दोन भगदाड पडले असून हा रहदारीचा मार्ग बंद पडण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.आंबिस्ते,पालसई, गौरापूर,देवघर,बोरांडा, घोडमाळ,रावाचा पाडा, आसनस कलंभई,खरीवली, भोपिवली,देवळी,आपटी, तसेच आजूबाजूच्या २५ गाव पाड्यांतील ग्रामस्थांचा दररोज ये-जा करण्याचा एकमेव हा रस्ता आहे.हा मार्ग पुढे कंचाड वरून वाडा- मनोर महामार्गाला जोडला जातो. तेथून तो घोडमाळमार्गे दुर्वेश वरून अहमदाबाद महामार्गाला जोडतो.ही मोरी फार जुनी असुन या मोरीचा पाईप पूर्णपणे फुटला आहे. त्याला सध्या दोन मोठे भगदाडे पडली आहेत.त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद पडण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” हिंदीची सक्ती ; भाजप व रा.स्व.संघाचे कुटील कारस्थान, आज शिवसेना ( उबाठा ) व मनसे यांचा वरळी येथे ऐतिहासिक विजयी मेळावा होत आहे.या मेळाव्याबाबत राज्याच्या जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.हिंदी सक्तीच्या प्रश्नावर राज्य सरकारला माघार घ्यावी लागली.त्या पार्श्वभूमीवर हा विजयी मेळावा होत आहे.सरकारकडून झालेली हिंदीची सक्ती व त्यावर मराठी भाषिक जनतेमध्ये उसळलेली संतापाची लाट,त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणूस या विजयी मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होत आहे.हा विजयी मेळावा ऐतिहासिक होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काल पुणे येथे झालेल्या गुजराती समाजाच्या कार्यक्रमासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या भाषणाच्या शेवटी…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” भारतीय संविधान मोडीत काढणे,कदापि शक्य होणार नाही… गेल्या काही वर्षांपासून भारतीय संविधानाला नख लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.” संविधान,” या शब्दाची आपल्या महायुती सरकारला ऍलर्जी असल्याचे पदोपदी पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे गटाच्या एका महिला आमदाराने सभागृहात वारीमध्ये अर्बन नक्षलवादी संघटनाचा शिरकाव झाल्याचा सनसनाटी आरोप नुकताच केला. याविषयी उदाहरण देताना त्यांनी अर्बन नक्षलवाद्याच्या संघटनेचे नांव ” संविधान वारी,” असल्याचे सांगितले.या वारीच्या वारकरकऱ्यांनी वारीमध्ये संविधानाची पूजा केली,असे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.गेल्या सात दशकात ” संविधान, ” या शब्दाची ऍलर्जी कोणालाच नव्हती. तसेच ” अर्बन नक्षलवाद,” शब्द देखील कुठून आला,हे तुम्हा-आम्हाला कळले देखील नाही. केंद्र व राज्यसरकार एकीकडे…
दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” पालघर जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्या, महायुती आरामात खिश्यात घालणार, जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक शाखेने नूकताच जाहीर केला आहे.त्यामुळे निवडणुकीचे पडघम लवकरात लवकर वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक शाखेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार १४ जुलै २०२५ रोजी प्रारूप प्रभाग रचना,टप्पा प्रसिद्ध करणे, हरकती,सूचना व सुनावणी इ.सोपस्कार याच महिन्यात २८ जुलै रोजी पार पडणार आहे. अंतिम प्रभाग रचना १८ ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक शाखेकडे सादर करणे, निर्वाचक गण अंतिम अधिसूचना १८ ऑगस्ट रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम प्रसिद्ध झाल्यामुळे राजकीय पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या…
दिपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” हलाखीचे जीवन जगणारा आमचा अन्नदाता व निर्लज्ज सरकार, देशाच्या विकासामध्ये शेतकरी व कामगार या दोन वर्गचे फार मोठे योगदान असल्याचे आपण सतत ऐकत असतो.या दोन वर्गापैकी एकाने आपली भूक मिटवली तर दुसऱ्या वर्गाने आपल्या कष्टाने रोजगार निर्मिती केली.त्यामुळे आपला देश कृषीप्रधान व उद्योगशील देश म्हणून ओळखला जाऊ लागला.पण आज हे दोन्ही वर्ग राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे हलाखीचे जीवन जगत आहेत.आज त्यांना कोणीच वाली उरलेले नाही. दोन दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यात एक शेतकरी त्याच्याकडे बैल नसल्यामुळे स्वतःच्या मानेवर हौद ठेवून नांगरणी करत असल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले व सरकार खडबडून जागे झाले.अभिनेते सोनू सुद यांनी त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर…
जव्हार प्रतिनिधी, प्रयास फाउंडेशन ट्रस्टतर्फे मोहाचापाडा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, जव्हारमधील दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून प्रयास फाउंडेशन ट्रस्ट या संस्थेतर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळा,मोहाचा पाडा येथे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमांतर्गत शाळेच्या १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, पाटी,पेन्सिल,शार्पनर,कंपास बॉक्स,खोडरबर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक संतोष रजपूत,सहशिक्षक राजेंद्र महाजन,गोविंद वळवी,रावते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थित सर्वांनी ” प्रयास फाउंडेशन ट्रस्ट,” च्या या सामाजिक उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले व आभार मानले.शाळेच्या…
