जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा संपन्न,
भारती विद्यापीठ प्रशाला ज्युनिअर कॉलेज जव्हार येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक तरवारे के.पी.यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या पालखीचे व तुळशीचे पूजन करण्यात आले.यावेळी तरवारे के.पी. यांनी श्री पांडुरंगाच्या आषाढी एकादशीचे महत्त्व वारकरी परंपरेची पार्श्वभूमी,वारीचे महत्त्व,संतांनी जपलेली परंपरा अनेकविध संतांनी समाजाला दिलेली शिकवण,सामाजिक प्रबोधन समजून घेण्यासंदर्भात सविस्तर विवेचन केले.त्यानंतर श्री विठ्ठलाच्या नामस्मरणाचा गजर करण्यात आला.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री पांडुरंग व रखुमाई यांची वेशभूषा साकारली व संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ,संत चोखामेळा,संत मुक्ताबाई,संत जनाबाई व वारकरी भक्त मंडळी यांची पारंपारिक वेशभूषा साकारली. भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज जव्हारच्या परिसरात पालखी व पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेवेळी पांडुरंगाच्या नामाचा गजर,अभंग, टाळ,मृदुंगाच्या तालात भक्तिमय होऊन विठ्ठल नामाच्या गजरात फुगडी,अभंग वारकरी नृत्य सादर करण्यात आले.त्यात विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी, मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

