जव्हार प्रतिनिधी,
प्रयास फाउंडेशन ट्रस्टतर्फे मोहाचापाडा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप,
जव्हारमधील दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून प्रयास फाउंडेशन ट्रस्ट या संस्थेतर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळा,मोहाचा पाडा येथे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमांतर्गत शाळेच्या १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, पाटी,पेन्सिल,शार्पनर,कंपास बॉक्स,खोडरबर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक संतोष रजपूत,सहशिक्षक राजेंद्र महाजन,गोविंद वळवी,रावते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थित सर्वांनी ” प्रयास फाउंडेशन ट्रस्ट,” च्या या सामाजिक उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले व आभार मानले.शाळेच्या मुख्याध्यापकांनी संस्थेचे विशेष आभार मानत सांगितले की, “अशा प्रकारच्या मदतीने ग्रामीण भागातील शिक्षणाची गती वाढण्यास नक्कीच मदत होते.विद्यार्थ्यांमध्ये शालेय साहित्याच्या अभावामुळे येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत.हा उपक्रम शाळा, शिक्षक,
पालक आणि सामाजिक संस्था यांच्यातील सकारात्मक समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

